Advertisement

रोबो करणार आता गटारांची सफाई

भारत पेट्रोलिअम कंपनीने मॅनहोलमध्ये जाऊन सफाई करणारे दोन रोबो तयार केले आहेत. हो दोन्ही रोबो मुंबई महापालिकेच्या एम पश्चिम विभागाला बीपीसीएलने सुपूर्द केले आहेत.

रोबो करणार आता गटारांची सफाई
SHARES

मुंबईत मॅनहोलमध्ये सफाई करताना आतापर्यंत अनेक सफाई कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे भविष्यात आणखी कर्मचाऱ्यांचा जीव जाऊ नये म्हणून आता गटारांची सफाई रोबोकडून करून घेण्यात येणार आहे. भारत पेट्रोलिअम (बीपीसीएल) कंपनीने मॅनहोलमध्ये जाऊन सफाई करणारे दोन रोबो तयार केले आहेत. हो दोन्ही रोबो मुंबई महापालिकेच्या एम पश्चिम विभागाला बीपीसीएलने सुपूर्द केले आहेत. 

बीपीसीएलने आपल्या कंपनीच्या आवारात या रोबोंची चाचणी घेतली. त्यानंतर हे रोबो पालिकेला देण्यात आले. मुंबईत मोठ्या प्रमाणावर गटारे तुंबत असतात.  मॅनहोलमध्ये उतरून कामागारांना सफाई करावी लागते. मॅनहोलमध्ये कामगाराला उतरवण्यास बंदी आहे.मात्र, अनेक  कंत्राटदार कामगारांना मॅनहोलमध्ये उतरवतात.  बंद गटारांमधील घातक वायूंमुळे कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत. याशिवाय कामगारांच्या आरोग्यावरही याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे बीपीसीएलने स्टार्टअप इंडिया अंतर्गत केरळमधील एका रोबोटिक कंपनीतून  ८८ लाख रुपये किमतीचे हे दोन रोबो तयार करून घेतले आहेत. 

हे रोबो १०० फूट खोल मॅनहोलमध्ये जाऊन सफाई करणार आहेत. त्यामुळे कामगारांना  मॅनहोलमध्येे उतरण्याची गरज भासणार नाही. गुरुवारी बीपीसीएलचे अधिकारी एच.अय्यर यांच्या हस्ते हे दोन्ही रोबो पालिकेच्या एम पश्चिमचे साहाय्यक आयुक्त पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.


हेही वाचा -

मुंबईत शिवसेनाच किंग, किशोरी पेडणेकर बनल्या नव्या महापौर

धक्कादायक! मुंबई महिलांसाठी असुरक्षितच, वाढले 'एवढे' गुन्हे




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा