Advertisement

Coronavirus Outbreak: वॉर्ड D मध्ये कोरोना रुग्णांच्या आकड्यात वाढ

D वॉर्डमध्ये ब्रीच कँडी, नेपियन सी रोड, कुंबल्ला आणि मलबार हिल्स, गामदेवी आणि ग्रँट रोड अशा भागांचा समावेश आहे.

Coronavirus Outbreak: वॉर्ड D मध्ये कोरोना रुग्णांच्या आकड्यात वाढ
SHARES

लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानं कोरोनाव्हायरसच्या रुग्णांचा आकडा वाढत आहे. वॉर्ड D मध्ये देखील सध्या अशीच परिस्थिती आहे. गेल्या आठवड्यात D वॉर्डमध्ये दिवसाला ६० कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळत आहेत. यातील बहुतांश हे उच्च जोखीम प्रकारातील रुग्ण आहेत.

D वॉर्डमध्ये ब्रीच कँडी, नेपियन सी रोड, कुंबल्ला आणि मलबार हिल्स, गामदेवी आणि ग्रँट रोड अशा भागांचा समावेश आहे. ७ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट या कालावधीत प्रभागात दररोज ६० नवीन रुग्ण नोंदवले गेले आहेत. यापूर्वी दररोज सापडणाऱ्या रुग्णांचा आकडा ४० च्या घरात होता. आता यात वाढ झालेली दिसून येत आहे.  

कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पालिका आता या भागातील संपूर्ण इमारती सील करत आहे. ज्या भागात कोरोनाचे अधिक रुग्ण आढळून येत आहेत तिथल्याच इमारती सील करण्यात येत आहेत. शिवाय, पालिका प्रशासनाच्या अहवालानुसार, D वॉर्डमधील संपूर्ण कुटुंब अलिकडच्या काळात कोरोनाची तपासणी करून घेत आहे.

जुलैच्या सुरुवातीस, एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत, दक्षिण मुंबईतील मलबार हिल आणि त्याच्या आसपासच्या परिसरातील सर्वाधिक इमारती सीलबंद झाल्या आहेत. मुंबईतील एकूण सील इमारतींपैकी सर्वाधिक इमारती याच परिसरातील आहेत.

प्रशासनानं कोरोना रुग्णांच्या वाढिचं कारण देखील दिलं आहे. घर कामासाठी येणाऱ्या बायका आणि ड्रायव्हर यांच्यामुळे व्हायरस पसरत आहेत. तर बरेच नागरिक लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे कामासाठी म्हणून घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे देखील कोरोनाचा प्रादुर्भाव या परिसरात वाढला आहे.



हेही वाचा

'या' १० वॉर्डमध्ये ४६ टक्के कोरोना रुग्ण, पालिका देणार विशेष लक्ष

COVID 19 लसीच्या केईएम रुग्णालय घेणार चाचण्या

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा