Advertisement

डोंबिवलीत इमारत कोसळली, तरूणाच्या सतर्कतेमुळे १४ कुटुंबांना वाचवलं

कुणाल पहिल्या माळ्यावर राहतो. पहाटे ३.४५ च्या सुमारास इमारतीचा मागचा काही भाग पडला असल्याचं कुणालच्या लक्षात आलं.

डोंबिवलीत इमारत कोसळली, तरूणाच्या सतर्कतेमुळे १४ कुटुंबांना वाचवलं
SHARES

डोंबिवलीतील पहाटेकोपर गावातील मैना ‘व्ही २’ ही ३ मजली इमारत कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. एका तरूणाच्या सतर्कतेमुळे यावेळी मोठी दुर्घटना टळली. या तरुणामुळे १४ कुटुंबाचे प्राण वाचले. 

कुणाल मोहिते असं या तरुणाचे नाव आहे. कुणाल पहिल्या माळ्यावर राहतो. पहाटे ३.४५ च्या सुमारास इमारतीचा मागचा काही भाग पडला असल्याचं कुणालच्या लक्षात आलं. त्याने तात्काळ ही बाब रहिवाशांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर पूर्ण इमारत रिकामी करण्यात आली. इमारत रिकामी करताच अवघ्या २० मिनिटात इमारत कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, सर्व कुटुंबांच्या सामानाचे प्रचंड नुकसान झाले.

घटनास्थळी डोंबिवली अग्निशमन केंद्राचे १ वाहन आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडील संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित असून उर्वरित इमारत तोडण्याचे काम सुरु आहे.



हेही वाचा -

Coronavirus Updates: मुंबईत चाचण्यांच्या तुलनेत बाधितांच्या संख्येत घट

नवी मुंबईत महिन्यात रुग्ण दुपटीचा कालावधी १८६ दिवसांवर


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा