Advertisement

Buldhana Accident : मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत जाहीर : मुख्यमंत्री

जखमी रुग्णांचा खर्च राज्य सरकारच्या वतीनं करण्यात येणार आहे.

Buldhana Accident : मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत जाहीर : मुख्यमंत्री
SHARES

बुलढाणा जिल्ह्यात खासगी बसच्या अपघातात 25 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारच्या वतीनं पाच लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.

बुलढाणा जिल्ह्यात झालेली अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी आणि दुख:द आहे. यामध्ये बसने पेट घेतल्यानं 25 जणांचा मृत्यू झाला आहे. आठ लोक जखमी आहेत. मी याबाबत जिल्ह्याधिकारी तेथील पोलिस अधिकारी यांच्याशी बोलत आहे.

जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर चांगले उपचार करण्याच्या सूचना मी दिल्या असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

जखमी रुग्णांचा खर्च राज्य सरकारच्या वतीनं करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून पाच लाखांची मदत दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

अपघात झाल्यानंतर तात्काळ त्याठिकाणी यंत्रणा दाखल झाल्या होत्या. पण बसने मोठा पेट घेतल्यानं बसमधील प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

समृद्धी महामार्गावर प्रशासन योग्य त्या उपायोजना करत आहे. काही वेळेला वेगावर नियंत्रण नसल्यानेही अपघात होत आहेत. त्यामुळं वाहनचालकांनी देखील वाहन चालवताना काळजी घेणं गरजेचं असल्याचे मुख्यमंत्री एकाथ शिंदे म्हणाले. 

प्रवाशांना सुरक्षीतस्थळी नेणं ही वाहनचालकांची जबाबदारी असते. त्यामुळं सर्वांनी नियमांचे पालन करणं गरजेचं असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. अपघाताला ज्या गोष्टी कारणीभूत आहेत, त्यावर योग्य त्या उपाययोजना केल्या जातील असे मुख्यमंत्री म्हणाले.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा