Advertisement

जवाहर द्विपवरील धुमसती आग तीन दिवसानंतर आटोक्यात


जवाहर द्विपवरील धुमसती आग तीन दिवसानंतर आटोक्यात
SHARES

मुंबईच्या जवाहर द्विप (बुचर आयलंड) येथील मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीच्या तेल टाक्यांना लागलेली आग तीन दिवसानंतर आटोक्यात आली आहे. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास वीज पडून येथील तेलाच्या टाकीला आग लागली होती. जवाहर द्विपपासून ८ किमी अंतरावर असलेल्या गेट वे आॅफ इंडियावरूनही या आगीच्या ज्वाळा दिसत होत्या.

ही आग विझवण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टचे अग्निशमन विभाग आणि मुंबई अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न सुरू होते. आगीचा भडका मोठा असल्याने ही आग विझवण्यासाठी फोम आणि इतर थंड केमिकलचा मारा सुरू होता.


जवाहर द्विप येथील ऑपरेशन यशस्वीपणे पूर्ण झाले असून यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट (एमपीपीटी), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (बीपीसीएल), ऑईल अॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लि. (ओएनजीसी), स्टेट प्लॅनिंग एजन्सी (सिडको) यांच्या अग्निशमन दलाची मदत घेत मुंबई अग्निशन दलाने ही आग आटोक्यात आणली आहे. ही आग पूर्णपणे विझवण्यास आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. 

- संजय भाटिया, एमबीपीटीचे अध्यक्ष


भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल)च्या 13 क्रमांकाच्या टाकीत आग लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पण असे काहीच झाले नाही. यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेमुळे बाजारात हाय-स्पीड डिझेलची कमतरता येणार नाही.

- मनोहर राव, कार्यकारी संचालक, बीपीसीएल



कच्चे तेल साठवण्याची ही जागा

बुचर आयलंड येथे टँकरद्वारे कच्चे तेल पोहोचवण्यात येते. त्यानंतर हे तेल पाईपलाईनद्वारे रिफायनरीत पोहोचवले जाते. पोर्ट ट्रस्ट येथे १.७९ लाख किलो लीटर तेल जमा करते.

बुचर आयलंडवरील आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी ४ फायर बंब कार्यरत होत्या. जवळच्या सर्व टाक्यांमधील तेल माहुल येथे पाईपद्वारे पोहोचवण्यात आले होते. याशिवाय तेलाने भरलेली जहाजेही बंदरात नांगरून ठेवण्यात आली होती.


हेही वाचा - 

२४ तासांनंतरही धुमसतेय जवाहर द्विपवरील आग



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा