Advertisement

राणी बागेत रविवारी विक्रमी पर्यटक; १८ हजार ७३१ तिकिटांची विक्री


राणी बागेत रविवारी विक्रमी पर्यटक; १८ हजार ७३१ तिकिटांची विक्री
SHARES

भायखळ्याच्या राणी बागेत रविवारी विक्रमी संख्येने पर्यटकांनी भेट दिली. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची संख्या वाढली असून रविवारी तब्बल १८ हजार ७३१ तिकिटे विकली गेली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर तिकिट खपाचा हा विक्रमच अाहे. यामधून राणी बागेला ७.१ लाख रुपयांची कमाई झाली अाहे. 


लोकांना परत पाठवलं

शनिवारी १५ हजार ७४३ तिकिट विक्रीतून ६.१ लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं होते. मागील वर्षी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये एका दिवशी ६.६ लाख रुपयांची तिकिटे खपली होती. रविवारी फक्त रांगेत उभे असणाऱ्यांनाच राणे बागेत जाण्याची परवानगी मिळाली. तर २ हजार लोकांना परत पाठवण्यात अाल्याचं राणी बागेचे संचालक संजय त्रिपाठी यांनी सांगितलं.


अतिरिक्त सुरक्षा रक्षक

 त्रिपाठी म्हणाले, शुक्रवारी ९ हजार लोकांनी राणी बागेला भेट दिली. त्यामुळे अतिरिक्त सुरक्षा रक्षक बोलावण्यात अाले. शनिवारी अाणि रविवारी या सुट्टीच्या दिवशी अाणखी पर्यटकांची गर्दी होईल याचा अंदाज अगोदरच अाला होता. 


तिकीट दर

  • मुले            -  २५ रुपये
  • प्रौढ            -  ५० रुपये
  •  कुटुंब (२ प्रौढ अाणि २ मुले)  - १०० रुपये हेही वाचा - 

रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर, तिकीट बुकिंगसाठी 15 मिनिटांचा जादा वेळ

पानाच्या पिचकाऱ्यांचे डाग निघणार सहज, रुईयाच्या विद्यार्थिनींचा नवा प्रकल्प
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा