Advertisement

मुंबई हायकोर्टाचा ताण होणार कमी! आता कोल्हापुरात तारीख पे तारीख!


मुंबई हायकोर्टाचा ताण होणार कमी! आता कोल्हापुरात तारीख पे तारीख!
SHARES

मुंबई हायकोर्टाचं एक खंडपीठ कोल्हापुरात स्थापन करण्याचा रस्ता अाता मोकळा झाला अाहे. कोल्हापूर खंडपीठासाठी महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेटनं मंजुरी दिली अाहे. राज्यातील औरंगाबाद, नागपूर आणि कोल्हापूर या तिन्ही प्रमुख खंडपीठांचा भार आतापर्यंत मुंबईवर येत होता. पण आता थोडा का होईना, पण हा भार कमी होणार आहे. कारण लवकरच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरला स्वतंत्र खंडपीठ मिळणार आहे. त्यामुळे आता कोल्हापुरातही तारीख पे तारीख सुरू राहणार, असं म्हणायला हरकत नाही.

यासाठी १०० कोटींची तरतूद

यापूर्वी कोल्हापुरात स्वतंत्र खंडपीठ व्हावं, या मागणीला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवला होता. तसंच मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी १०० कोटी रुपयांची ठोस तरतूद करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या दालनात ही बैठक झाली. राज्याच्या येत्या अर्थसंकल्पात यासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात येणार आहे.


चर्चा सकारात्मक

 खंडपीठासाठी शेंडा पार्क येथील ७५ एकर जागा अाणि उच्च न्यायालयाला हवे असलेले पत्र तातडीने देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाला बैठकीदरम्यान दिली. या बैठकीत खंडपीठ उभारण्याच्या दिशेने सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समजते. 


आता ताण कमी होणार?

कोल्हापुरात स्वतंत्र खंडपीठ व्हावे, यासाठी बार असोसिएशनने मागणी केली होती. केवळ बार असोसिएशनच नव्हे, तर सामान्य नागरिकांनी खंडपीठासाठी रस्त्यावर उतरून सरकारचे लक्ष वेधले होते. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाबाहेर बार असोसिएशनने साखळी उपोषण करून खंडपीठाची मागणी लावून धरली होती.  या खंडपीठामुळे मुंबई हायकोर्टावरील ताण निश्चितच कमी होणार आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा