Advertisement

लसीअभावी अनेक लसीकरण मोहीम पुन्हा थंडावली

कोरोनाला आळा घालण्यासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणात लसीकरण केलं जात आहे.

लसीअभावी अनेक लसीकरण मोहीम पुन्हा थंडावली
SHARES

कोरोनाला आळा घालण्यासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणात लसीकरण केलं जात आहे. मात्र, सध्यस्थितीत लसीच्या अपुऱ्या साठ्यामुळं राज्यात कोरोना लसीकरणाचा वेग मंदावला आहे. कोरोना लसीकरण केंद्र वारंवार बंद ठेवावे लागत आहे. मुंबई, ठाणे, वसई विरार यांसह अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद आहेत. यामुळे कोरोना लस घेण्याच्या प्रतिक्षेत असलेले अनेक नागरिक हैराण झाले आहेत.

कोरोना लसींच्या तुटवड्यामुळे मुंबई महापालिकेतील बहुतांश रुग्णालयात लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. कोरोना लसींचा तुटवडा असल्याने मुंबई महापालिकेनं बुधवारी लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. जुलैच्या तीन आठवड्यांमध्ये मुंबईतील लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची ही तिसरी वेळ आहे. त्यामुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागत आहे.

मुंबई महापालिकेला गेल्या शुक्रवारी ४५ हजार लसमात्रा मिळाल्या होत्या. मात्र पावसामुळं शनिवारी लसीकरण कमी झाले. त्यामुळं हा लससाठा मंगळवारपर्यंत वापरण्यात आला. मंगळवारी आणखी लससाठा मिळणे अपेक्षित होते. पण, मंगळवारी रात्री उशिरापर्यंत लससाठा मिळण्याबाबत कोणत्याही सूचना मिळाली नाही. त्यामुळे अखेर पालिकेने लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे.

लस तुटवड्यामुळे मुंबईतील लसीकरणाचा वेग मंदावला आहे. दरम्यान, ठाणे जिल्ह्यातही अनेक शहरांत लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. वसई विरार महापालिका हद्दीत आज दिवसभरासाठी लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आले आहेत.

केडीएमसीत २५ लसीकरण केंद्र बंद

कल्याण डोंबिवली महापालिकेत लस उपलब्ध नसल्याने सर्व २५ लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आले आहेत. सुरुवातीला नागरिकांचे लसीकरण सातत्याने सुरु होते. मात्र काही दिवसांपासून लस उपलब्ध होत नसल्याने वारंवार महापालिकेला आपल्या लसीकरण केंद्र बंद करावा लागत आहे. आतापर्यंत महापालिकेकडून ३ लाख ७३ हजार लस देण्यात आले आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा