Advertisement

मालवणीतील सामान्य रुग्णालयात होणार कर्करोग निदान केंद्र


मालवणीतील सामान्य रुग्णालयात होणार कर्करोग निदान केंद्र
SHARES

मालाडच्या मालवणी भागातील आरोग्य विभागाच्या सामान्य रुग्णालयात टाटा कर्करोग रुग्णालयाच्या साहाय्याने २६ जानेवारीपासून कर्करोग निदान केंद्र सुरु करण्यात येत असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली.

राज्यात १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत मौखिक आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. त्या अंतर्गत ग्रामीण भागातील १ कोटी ७३ लाख जणांची आशा कार्यकर्ते, एएनएम यांनी घरोघरी जाऊन प्राथमिक सर्वेक्षण तपासणी केली. तर, ३६ लाख जणांनी स्वत:हून आरोग्य केंद्रांमध्ये जाऊन तपासणी करून घेतली.


पुन्हा तपासणी

प्राथमिक सर्वेक्षणात तोंडात असलेले व्रण, वेदनाविरहित अल्सर यांची तपासणी करण्यात आली. या सर्वांची पुन्हा एकदा ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयात दंत शल्यचिकित्सक, कान, नाक, घसा तज्ञ, कॅन्सर वॉरीअर्स यांच्या माध्यमातून तपासणी केली जाईल, असेही सावंत म्हणाले.


मोफत शस्त्रक्रिया

साधारणतः एक लाख रुग्णांमागे मौखिक कर्करोगाचे १०ते १५ रुग्ण आढळण्याची शक्यता असते. अशा सर्व रुग्णांची कर्करोगपूर्व निदान चाचणी करण्यात येणार आहे. त्यांच्या आवश्यक त्या सर्व चाचण्या करून मोफत शस्त्रक्रियाही केल्या जाणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. यासाठी वैद्यकीय महाविद्यालये, टर्शरी कॅन्सर सेंटर, महात्मा फुले जनारोग्य योजनेत समावेश असलेले कर्करोग निदान रुग्णालये यांची मदत घेऊन मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा