Advertisement

मिरा रोडमध्ये मराठी माणूस नॉट अलाऊड, सोसायटीविरुद्ध गुन्हा दाखल

यांना फक्त गुजराती, मारवाडी,जैन समाजतल्यांना घर विकायचं आहे, असं म्हणत एकिकरण समितीनं गुन्हा दाखल केलाय. त्यामुळे महाराष्ट्रातच मराठी माणूस उपरा ठरू लागला आहे की काय?

मिरा रोडमध्ये मराठी माणूस नॉट अलाऊड, सोसायटीविरुद्ध गुन्हा दाखल
SHARES

मराठी माणसांना घरे नाकारणाऱ्यांवर अखेर गुन्हे दाखल झाले आहेत. मराठी एकीकरण समितीनं या मराठी द्वेष्ट्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. त्यामुळे मीरा रोडच्या नया नगर पोलिसांना अखेर गुन्हे नोंदवावे लागले आहेत.

मीरा रोडमध्ये मराठी माणसांना घरे नाकारली जात होती. फक्त गुजराती, मारवाडी, जैनांना घर विकायचे आहे, मराठी माणूस नॉट अलाऊड, असं सांगितलं जात होतं. मराठी माणसांना घर नाकारल्याची ऑडिओ क्लिीपही व्हायरल झाली होती. त्यामुळे मराठी माणसांमध्ये संतापाचं वातावणर निर्माण झालं होतं.

अखेर त्याची दखल घेऊन आम्ही नयानगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना सर्व प्रकार सांगितला. या प्रकरणाचं गांभीर्यही लक्षात आणून दिलं. त्यानंतर भादंवि कलम १५३ अ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असं मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांनी सांगितलं.

पुढील काळात राज्यात कुठेही मराठी माणसांना घरे नाकारल्यास अशा लोकांवर गुन्हे दाखल केले जातील, असं देशमुख यांनी सांगितलं.

गोवर्धन देशमुख यांनी ही तक्रार नोंदवली आहे. देशमुख हे २०१० पासून मीरा रोडमध्ये घर विकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी कांदिवलीच्या एका व्यक्तीची घराची जाहिरात पाहिली होती. त्यानुसार त्यांनी या व्यक्तीला फोन केला.

मात्र, समोरच्या व्यक्तीनं त्यांच्या सोसायटीत मराठी, मुस्लिम, ख्रिश्चनांना घरे देत नसल्याचं सांगितलं. तसा आमच्या सोसायटीचा नियम आहे. आमच्या सोसायटीत केवळ गुजराती, जैन आणि मारवाडी व्यक्तींनाच फ्लॅट विकले जात असल्याचं त्यानं सांगितलं.

त्यानंतर देशमुख यांनी या त्यांच्या दोन्ही मित्रांना हा प्रकार सांगून पोलिसात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नया नगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये ही माहिती नमूद करण्यात आली आहे.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा