Advertisement

सोसायटी सदस्यांनो जागरूक व्हा, इमारतींमध्ये सीसीटीव्ही सक्तीचं

मुंबई (mumbai), पुणे (pune), नागपूर (nagpur) आदी मोठ्या शहरांमधील नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV camera) बसविणे सक्तीचे करण्यात येणार आहे.

सोसायटी सदस्यांनो जागरूक व्हा, इमारतींमध्ये सीसीटीव्ही सक्तीचं
SHARES

मुंबई (mumbai), पुणे (pune), नागपूर (nagpur) आदी मोठ्या शहरांमधील नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV camera) बसविणे सक्तीचे करण्यात येणार आहे. वाढत्या गुन्हेगारीला (crime) आळा घालण्यासाठी नवीन इमारतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणं सक्तीचे करण्याचा प्रस्ताव आहे. याबाबतचा  प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळापुढे सादर करण्यात येणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी म्हटलं आहे. 

 मोठ्या शहरांमध्ये वाढत असलेली गुन्हेगारी (crime)  ही पोलिसांसाठी (police) मोठी डोकेदुखी ठरत आहे. गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी या सीसीटीव्हींचा उपयोग होणार आहे. सीसीटीव्हीमुळे गुन्हेगारीला आळा बसू शकतो हे लक्षात घेऊन तिन्ही शहरांतील नवीन इमारतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे  (CCTV camera) बसवण्याची सक्ती करण्याचा प्रस्ताव आहे.

मुंबई (mumbai), पुणे (pune), नागपूर (nagpur) मध्ये ९ हजार ८०० सीसीटीव्ही (CCTV camera) आहे. या सीसीटीव्हीची ११०० हून अधिक गुन्ह्य़ांची उकल करण्यास  मदत झाली आहे. सध्या मुंबईत १५१० ठिकाणी ५ हजार तर पुण्यात ४२५ ठिकाणी १२३४ सीसीटीव्ही बसवले आहेत. मुंबईत आणखी ५ हजार ६२५ सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत.  नागपूरमध्ये ३६०० सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. सीसीटीव्ही यंत्रणेमुळे धार्मिक आणि सार्वजनिक उत्सव, मोर्चे, आंदोलने, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे, निवडणुकांच्या वेळी प्रभावी नियंत्रण आणि चित्रीकरण करणे शक्य झाल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं.


हेही वाचा - सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करणाऱ्या सोसायट्यांना करसवलत

७३ वर्षाच्या म्हातारीलाही सुटेना जुगाचा नाद, अट्टल जुगारी ही थरथरा कापतात
संबंधित विषय