मतदान केंद्रांवर 2500 सीसीटीव्हींची नजर

 Kumbharwada
मतदान केंद्रांवर 2500 सीसीटीव्हींची नजर

मुंबई - मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्व मतदान केंद्रांवर सीसीटीव्हींची नजर राहणार आहे. ही नजर ठेवण्यासाठी तब्बल अडीच हजार कॅमेरे लावले जाणार आहेत.

महापालिका निवडणूक सुरळीत पार पडण्यासाठी मतदानाच्या आदल्या दिवशी तसेच मतदानाच्या दिवशी विविध ठिकाणच्या संवेदनशील मतदान केंद्रांवरील हालचालींवर देखरेख ठेवण्यासाठी हे कॅमेरे बसवले जाणार आहेत.

शहर विभागात 600, पश्चिम उपनगरात 1,100 आणि पूर्व उपनगरात 800 अशा प्रकारे सुमारे अडीच हजार कॅमेरे मतदान केंद्रांवर बसवले जाणार आहेत. 1 कॅमेरा, 1 डीव्हीआर, 1 मॉनिटर आणि 2 हजार 500 सीसीटीव्ही कॅमेरे अशी यंत्रणा दोन दिवस लावली जाणार असून यासाठी सुमारे अडीच कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

Loading Comments