Advertisement

हॅलिकॉप्टर दुर्घटनेत CDS जनरल बिपिन रावत यांचं निधन

दुर्घटनेत CDS जनरल बिपीन रावत यांचं निधन झालं आहे.

हॅलिकॉप्टर दुर्घटनेत CDS जनरल बिपिन रावत यांचं निधन
SHARES

तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं. या दुर्घटनेत CDS जनरल बिपीन रावत यांचं निधन झालं आहे. त्यांच्यासोबतच १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

कुन्नूरच्या जंगलात बुधवारी कोसळताच हेलिकॉप्टरला आग लागली. यामध्ये जनरल रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि लष्करी अधिकाऱ्यांसह १४ जण होते.

जनरल बिपीन रावत यांना वेलिंग्टन इथल्या लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

जनरल बिपिन रावत ३१ डिसेंबर २०१६ ते ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत लष्करप्रमुख पदावर होते. यानंतर १ जानेवारी २०२० मध्ये त्यांना चीफ ऑफ डिफेंस स्टाफ हे पद देण्यात आले.

(सविस्तर वृत्त लवकरच)


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा