Advertisement

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात ११ टक्के वाढ

केंद्रीय कर्मचाऱ्यांना दर ६ महिन्यांनी सुधारित महागाई भत्ता दिला जातो. वर्षात पहिल्यांदा १ जानेवारी आणि दुसरा १ जुलै रोजी महागाई भत्ता जारी केला जातो.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात ११ टक्के वाढ
SHARES

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा रोखलेला ११ टक्के वाढीव महागाई भत्ता जुलैपासून देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या कर्मचाऱ्यांना आता १७ टक्के ऐवजी २८ टक्के महागाई भत्ता मिळणार आहे.

कोरोनामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सरकारने रोखला होता. मात्र, हा भत्ता पुन्हा सुरू करण्यात आला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना दर ६ महिन्यांनी सुधारित महागाई भत्ता दिला जातो. वर्षात पहिल्यांदा १ जानेवारी आणि दुसरा १ जुलै रोजी महागाई भत्ता जारी केला जातो. मात्र, कोरोना संकटामुळे १ जानेवारी २०२० पासून त्यांचा महागाई भत्ता सरकारने रोखला होता. यामुळे त्यांना १७ टक्केच महागाई भत्ता दिला जात होता.

 जानेवारी २०२० मध्ये महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ झाली होती. त्यानंतर जुलै २०२० मध्ये ३ टक्के महागाई भत्ता वाढला होता. जानेवारी २०२१ मध्ये ४ टक्के महागाई भत्ता वाढला होता. परंतु हा ११ टक्के वाढीव महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिला जात नव्हता.  त्यावरील स्थगिती आता उठवल्यामुळे त्यांना जुलैपासून हा वाढीव ११ टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. याचा फायदा ५० लाखांहून अधिक सरकारी कर्मचारी आणि ६१ लाखांपेक्षा अधिक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना होणार आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा