Advertisement

रेल्वेने केला 'बसंती'चा २५०० रुपयांत लिलाव

रेल्वे कर्मचाऱ्यांनी सामान कक्षात या बकरीची चांगली देखभाल येथील कर्मचाऱ्यांनी घेतली. तिच्या खाण्या-पिण्याची काळजी घेतली. या बकरीचं नाव तिची देखभाल करणाऱ्या लोकांनी 'बसंती' असं ठेवलं होतं. रेल्वेने या बकरीचा लिलाव २५०० रुपयांमध्ये केला अाहे. या बकरीची किंमत ३ हजार रुपये ठरवण्यात अाली होती.

रेल्वेने केला 'बसंती'चा २५०० रुपयांत लिलाव
SHARES

मस्जिद स्थानकावर बुधवारी एका प्रवाशाला तिकीट तपासणीस राम कप्टे यांनी पकडलं. कारण या प्रवाशाबरोबर कोणीही स्त्री, पुरूष नव्हे, तर चक्क बकरी 'विदाऊट तिकीट' प्रवास करत होती. प्रवाशाने 'टीसी'ला अापलं तिकीट दाखवलं. पण रेल्वेतून कोणत्याही प्राण्याला घेऊन प्रवास करण्यास बंदी असल्याने त्यांनी प्रवाशाला बकरीसोबत आणल्याबद्दल दंड भरण्यास सांगितलं.  

'टीसी'ने दंडाची मागणी करताच हा प्रवासी चक्क बकरीला स्थानकावर सोडून पळून गेला. अाता या बकरीचं करायचं काय असा प्रश्न 'टीसी'ला पडला. त्यांनी अापल्या वरिष्ठांशी संपर्क साधून या बकरीला ताब्यात घेतलं. अाणि तिला सामान कक्षात नेलं.

बकरीची चांगली देखभाल

सामान कक्षात या बकरीची चांगली देखभाल येथील कर्मचाऱ्यांनी घेतली. तिच्या खाण्या-पिण्याची काळजी घेतली. या बकरीचं नाव तिची देखभाल करणाऱ्या लोकांनी 'बसंती' असं ठेवलं होतं. रेल्वेने या बकरीचा लिलाव २५०० रुपयांमध्ये केला अाहे. या बकरीची किंमत ३ हजार रुपये ठरवण्यात अाली होती. 

याबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, या बकरीच्या मालकाने बकरीवर दावा सांगितला नसल्याने हा लिलाव नियमानुसार करण्यात अाला. बुधवारपासून बकरीला सीएसटी स्थानकावर दोरीने बांधण्यात अाली होती.  तिच्या शरीरावर एक चिठ्ठी लावून त्यावर ३ हजार रुपये किंमत लिहिली होती. बुधवारी लिलावासाठी कोणीही अालं नाही. मात्र, गुरूवारी २५०० रुपयांमध्ये ही बकरी विकण्यात आली.  



हेही वाचा - 

घाटकोपर मेट्रो स्थानकावर राडा, धक्काबुक्कीविरोधात प्रवाशाची तक्रार

प्रवासी आरक्षण केंद्र 2 ऑगस्टला तात्पुरते बंद



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा