Advertisement

मागाठाणे मेट्रो स्टेशनजवळील रस्ता खचल्याप्रकरणी बिल्डरवर गुन्हा दाखल

बिल्डरच्या खोदकामामुळे कथितरित्या स्टॉर्म-वॉटर ड्रेन चेंबरच्या शेजारील माती कोसळली आणि चेंबरच्या भिंतीला नुकसान झाले.

मागाठाणे मेट्रो स्टेशनजवळील रस्ता खचल्याप्रकरणी बिल्डरवर गुन्हा दाखल
SHARES

पश्चिम द्रुतगती महामार्गावरील बोरिवली येथील मागाठाणे मेट्रो स्थानकाबाहेरील रस्ता मंगळवारी खचला होता. या रस्त्यावर उपाययोजना सुरू असतानाच या ठिकाणी नाल्याची भिंत पडल्याची घटना घडली. या घटनेनंतर नाल्याचे पाणी वेगाने या रस्त्यावर येऊ लागले. 

मागाठाणे मेट्रो स्थानकाजवळ रस्ता खचल्यानंतर, बृहन्मुंबई महानगरपालिकेने चांडक बिल्डरविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे, ज्यांच्या खोदकामामुळे कथितरित्या स्टॉर्म-वॉटर ड्रेन चेंबरच्या शेजारील माती कोसळली आणि चेंबरच्या भिंतीला नुकसान झाले.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. बिल्डरला काम बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली.

महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मते, स्टेशनच्या एंट्री/एक्झिट 2 जवळ स्टॉर्म-वॉटर ड्रेनचे चेंबर पायऱ्या आणि एस्केलेटरच्या पायाजवळ आहे. बांधकाम व्यावसायिकाने नाल्याच्या चेंबरजवळ खोल खोदकाम केल्याने त्याच्या भिंतीला तडे गेले. यामुळे उत्खनन क्षेत्रात वादळाचे पाणी वाहून गेले, ज्यामुळे ड्रेन चेंबर आणि पायऱ्या आणि एस्केलेटरचा पाया आणखी कोसळण्याचा संभाव्य धोका निर्माण झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

महापालिकेने बुधवारी बीएमसी आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासोबत रस्त्याच्या  जागेची पाहणी केली.

मागाठाणे मेट्रो स्थानकाबाहेरील सेवा रस्ता मंगळवारी अचानक खचला. या सेवा रस्त्याजवळच बहुमजली इमारतीच्या खोदकामामुळे रस्ता खचल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे.

दरम्यान संबंधित विकासकावर नोटीस बजावून काम थांबविण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेने दिले आहेत. सेवा रस्त्यावरील मागाठाणे मेट्रो स्थानकाजवळ खाजगी विकासकांच्या बहुमजली इमारतीच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. या कामासाठी विकासकाने मोठ्या प्रमाणात खोदकाम केले आहे. या कामामुळेच रस्ता खचल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या विकासकाला पुन्हा एकदा भराव घालण्यास सांगण्यात आले आहे.

आज जोरदार पाऊस पडल्याने या रस्त्याला लागून असलेली नाल्याची भिंतही कोसळली. त्यामुळे नाल्याचे पाणी वेगाने या खचलेल्या भागात येत होते.

समाजमाध्यमांवर याच्या ध्वनीफिती फिरू लागल्यामुळे येथे भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पर्जन्य जलवाहिन्या विभाग व संबंधित अधिकाऱ्यांनी आज पुन्हा घटनास्थळी भेट देऊन उपाययोजनाबाबत निर्णय घेतला. येथील नाल्याचे पाणी वळवून जमिन पूर्ववत करण्यास सुरूवात झाली असल्याची माहिती संबंधित अधिका-याने दिली.

येत्या दोन दिवसात हे काम पूर्ण होईल. रस्त्याचे काम पूर्ण होण्यास आठ दिवस लागतील असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.

रस्ता खचलेल्या ठिकाणाहून मागाठाणे मेट्रो स्थानकात जाणारे प्रवेशद्वारही बंद करण्यात आले आहे. रस्ता खचल्यामुळे नजीकच्या मागाठाणे मेट्रो स्थानकातील प्रवाशांची गैरसोय झाली आहे. रस्ता खचल्यामुळे मागाठाणे मेट्रो  स्थानकातील उत्तरेकडील प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना इतर पर्यायी प्रवेशद्वारांचा वापर करावा लागणार आहे.



हेही वाचा

मागाठाणे मेट्रोच्या प्रवाशांनो 'हे' बदल जाणून घ्या

बोरिवलीतील मागाठाणे मेट्रो स्थानक धोक्यात, दरड कोसळल्याचा व्हिडिओ व्हायरल

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा