नाल्याची भिंत कोसळली

 Kandivali
नाल्याची भिंत कोसळली

कोकणनगर - चेंबूरच्या कोकणनगरमधील चरई नाल्याची मोठी भिंत रविवारी पहाटे कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गेल्या अनेक वर्षांत या भिंतीची पालिकेकडून डागडुजी झालेली नाही. त्यामुळे वर्षभरात अनेकदा याठिकाणी भिंती कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र पालिकेकडून तात्पुरत्या स्वरुपाची डागडुजी केली जाते. या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात उंदीर आणि घुशींचा वावर आहे. त्यामुळं या भिंती पोखरल्या जात असल्यानं पालिकेनं एकदाच याठिकाणी आरसीसी पद्धतीची भिंत उभी करावी अशी मागणी परिसरातील रहिवाशी संजय जाधव यांनी केली आहे.

Loading Comments