Advertisement

मुंबईतल्या 'या' ४ स्थळांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश


मुंबईतल्या 'या' ४ स्थळांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश
SHARES

ब्रिटिशांच्या राजवटीतील मनोरंजनाचे मुख्य केंद्र ते अनेक हिंदी चित्रपटांची गोल्डन ज्युबिली साजरी करणारे चित्रपटगृह असा जवळपास १൦൦ वर्षांचा इतिहास एकाच जागी उभे राहून अनुभवणाऱ्या मुंबईतील रॉयल ऑपेरा हाऊसला आता जागतिक ओळख मिळाली आहे. युनेस्कोनं रॉयल ऑपेरा हाऊसला जागतिक वारसाचा दर्जा दिला आहे.

युनेस्कोतर्फे सांस्कृतिक वारसा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यात आशिया आणि पॅसिफिक भागातील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यात भारतातील सात स्थळं आहेत. त्यामध्ये मुंबईतल्या चार स्थळांचा समावेश करण्यात आला आहे.


मुंबईतील चार जागतिक वारसा लाभलेली स्थळं

  • रॉयल ऑपेरा हाऊस
  • भायखळा चर्च
  • बोमोनजी होरमजी वाडिया फाऊंटेन अँड क्लॉक टॉवर
  • वेलिंग्टन फाऊंटेन

भायखळा चर्च आणि रॉयल ऑपेरा हाऊस या स्थळांना गुणवत्ता पुरस्कार जाहीर झाला आहे. तर बोमोनजी होरमजी वाडिया फाऊंटेन अँड क्लॉक टॉवर आणि वेलिंग्टन फाऊंटेन या दोन वारसा स्थळांना विशेष उल्लेखनीय पुरस्कार जाहीर झाला आहे.


मुंबईतल्या या ४ स्थळांचा इतिहास


रॉयल ऑपेरा हाऊस

१९११ साली काम पूर्ण होण्याआधीच किंग जॉर्ज पाचनं या इमारतीचं उद्घाटन केलं होतं. १९१२ मध्ये ही रॉयल ऑपेरा हाऊस इमारत पूर्णपणे तयार झाली. ब्रिटिशांच्या काळात ऑपेरा आणि ब्रॉडवेज गाजवणारी ही वास्तू पुढे हिंदी चित्रपटांसाठी मानाचे चित्रपटगृह ठरले. अनेक चित्रपटांनी ऑपेरा हाऊसमधून यशाची मुहूर्तमेढ रोवली. मात्र काळाच्या ओघात या वास्तूची पडझड होऊ लागली. त्यामुळे १९३३ साली ऑपेरा हाऊस बंद करण्यात आलं.

पण २३ वर्षांनंतर या वास्तूचे पुनरुज्जीवन करण्यात आले. पुनरुज्जीवन करताना ब्रिटिश आणि भारतीय शिल्पकलेचा आधार घेण्यात आला. अखेर २൦१६ मध्ये ही वास्तू पुन्हा एकदा मुंबईकरांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली.


भायखळा चर्च

भायखळा चर्च हे ख्रिस्त चर्च या नावानं देखील ओळखले जाते. ख्रिस्त चर्च १८५१ मध्ये बांधण्यात आले आहे. पोर्तुगीज सैनिक दर रविवारी सकाळी संचलन करत या चर्चमध्ये उपासनेसाठी येत. हे चर्च त्यावेळी मुंबईचे गव्हर्नर असलेले एल्फिन्स्टन यांनी बनवले होते. मुंबईत इंग्रजांना प्रार्थना करता यावी, यासाठी हे चर्च उभारण्यात आले होते.


ख्रिस्त चर्चचं बांधकाम मातीच्या भेंड्याचे आहे. सप्टेंबर १९५७ साली आलेल्या पुरात पश्चिमेकडील भिंत आणि चर्च बेल असलेला मनोरा ढासळला होता. पण नंतर निधी गोळा करून त्याची दुरुस्ती करण्यात आली.


बोमोनजी होरमजी वाडिया फाऊंटेन अँड क्लॉक टॉवर

1882 साली हा क्लॉक टॉवर उभारण्यात आला होता. बोमोनजी वाडिया यांच्या स्मरणार्थ ही वास्तू बनवण्यात आली होती. या वास्तूवर पारशी बांधवांसाठी पवित्र अशा अग्निचे चित्र देखील कोरलेले आहे.


बाजार गेट आणि नरिमन स्ट्रीटच्या मध्यभागी हा टॉवर उभारण्यात आला. मात्र, काळाच्या ओघात हा टॉवर जीर्ण झाला. पण २൦१६ साली काला घोडा असोसिएशननं या टॉवरची डागडुजी करण्याचा निर्णय घेतला. या डागडुजीची संपूर्ण जबाबदारी आर्किटेक्ट विकास दिलवारी याच्याकडे सोपवण्यात आली. पुनरुज्जीवन करून यावर्षीच्या फेब्रुवारीत क्लॉक टॉवरचे उद्घाटन करण्यात आले.


वेलिंग्टन फाऊन्टेन


मुंबईतल्या अनेक सुंदर कारंज्यांपैकी एक म्हणजे वेलिंग्टन फाऊंटेन. सुमारे 150 वर्षांपूर्वी वेलिंग्टन ड्युकच्या स्मरमार्थ हा फाउंटेन बनवण्यात आला होता. हा फाऊंटेन बरीच वर्ष रीगल सर्कलमध्ये उभा आहे.



हेही वाचा

परळमधल्या ऐतिहासिक मैलाच्या दगडाचे जतन


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा