छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस..१२९ वर्षांचा इतिहास


  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस..१२९ वर्षांचा इतिहास
SHARE

मध्य रेल्वेचे मुख्यालय आणि जागतिक वारशांच्या यादीत समावेश झालेले मुंबईचे झळाळते वैभव 'छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस'ने आपल्या वयाची 129 वर्षे नुकतीच पूर्ण केली आहेत. दररोज लाखो प्रवाशांचा वावर असलेल्या या ऐतिहासिक स्थानकाला पहाण्यासाठी हजारो पर्यटक मुंबईत येतात. मुंबई दर्शनासाठी आलेल्या पर्यटकाने 'सीएसएमटी' इमारतीचे वैभव पाहिले नाही, असे कधी होणारच नाही.

ब्रिटिश सम्राज्ञी एलिझाबेथ यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 'सीएसएमटी'ची दिमाखदार इमारत 1888 मध्ये पूर्णत्वास आली. तेव्हा 'व्हिक्टोरिया टर्मिनस' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीचे 1996 मध्ये 'छत्रपती शिवाजी टर्मिनस' असे नामकरण झाले. 2004 मध्ये 'सीएसएमटी' ला युनेस्कोने जागतिक वारसाचा बहुमान दिला.

गेल्या 129 वर्षांच्या कालावधीत बरेच बदल झाले. स्वातंत्र्यानंतर मध्य रेल्वेचे मुख्यालय म्हणून 'सीएसएमटी' ओळखले जाऊ लागले. 2013 मध्ये 125 वर्षपूर्तीनिमित्त विशेष टपाल कव्हर प्रदर्शित करण्यात आले. 2016 मध्ये सर्वाधिक पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या 10 वास्तूंमध्ये या इमारतीचा समावेश करण्यात आला.

इतका आला होता खर्च -
या वास्तूच्या बांधकामाला 16.13 लाख खर्च आला होता. भारतीय वास्तुकलेचा विचार करुन ही वास्तू गॉथिक शैलीत बांधण्यात आली. या वास्तूची रचना इंग्रजीतील 'सी' अक्षरात करण्यात आली आहे. या ठिकाणी 6 फलाट बांधण्यासाठी 10.4 लाख रुपये खर्च आला होता. त्यानंतर 1929 साली या फलाटांचे 13 फलाटांमध्ये पुर्ननिर्माण करण्यात आले. 1994 साली यातील यार्डमध्ये बदल करून त्यात 2 फलाट वाढवण्यात आले. त्यानंतर फलाटांची संख्या 15 करण्यात आली. सध्या या स्थानकात फलाटांची संख्या 18 वर आली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या