Advertisement

चेंबुरमध्ये रहिवाशांचे विकासकाविरोधात उपोषण


चेंबुरमध्ये रहिवाशांचे विकासकाविरोधात उपोषण
SHARES

एसआरए प्रकल्पाला सुरुवात होउन दहा वर्षे उलटलेले असताना विकासकाकडून इमारतीचा साधा पाया देखील खोदला जात नसल्याने चेंबूरमधील रहिवाशांनी बुधवारपासून विकासकाविरोधात आंदोलन सुरू केले आहे. 

२००७ पासून वाशी नाका परिसरातील ओम गणेशनगर आणि अशोकनगर या परिसरात विकासकाकडून एसआरए प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर गेल्या काही वर्षांत या परिसरातील अडीच हजार झोपड्या विकासकाने तोडल्या. मात्र गेल्या वर्षभरापासून या रहिवाशांना विकासक घरभाडेच देत नाही. त्यामुळे रहिवाशांमध्ये संतापाची भावना आहे. 

दरम्यान, बुधवारपासून परिसरातील सामाजिक कार्यकर्ता निलेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली रहिवाशांनी विकासकाविरोधात अामरण उपोषण सुरु केले आहे. जोपर्यंत विकासकाकडून मागण्यांची पूर्तता केली जाणार नाही, तोपर्यंत उपोषण सुरुच ठेवणार असल्याची माहिती भोसले यांनी यावेळी दिली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा