Advertisement

श्रावण संपताच चिकन, अंडी महागली

श्रावण व गणेशोत्सव यामुळं अनेकजण मांसाहारी खाद्यपदार्थ खात नाही. मात्र श्रावण महिना संपताच अनेकांनी चिकन व अंडीच्या खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे.

श्रावण संपताच चिकन, अंडी महागली
SHARES

श्रावण व गणेशोत्सव यामुळं अनेकजण मांसाहारी खाद्यपदार्थ खात नाही. मात्र श्रावण महिना संपताच अनेकांनी चिकन व अंडीच्या खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे. परंतु, यावेळी नागरिकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. खवय्यांनी मांसहार सुरू केल्याने अंडी आणि चिकनच्या दरात वाढ झाली आहे. चिकनच्या दरात १० तर अंडी १ रुपयांनी महागले आहे.

श्रावण महिन्यातील उपवास आणि गणेशोत्सवाचा काळ संपताच चिकन आणि अंड्यांचे भाव वधारले आहेत. सोयाबीन आणि मका महागल्याने मासांहार सेवनाकडे वळल्याने गेल्या २ ते ३ दिवसांत कोंबडी तसेच अंड्यांच्या दरात वाढ झाली आहे. ब्रॉयलर आणि गावठी कोंबडीच्या दरात प्रति किलोमागे १० रुपयांनी तर, अंड्याच्या दरात प्रति नग १ रुपयाने वाढ झाली आहे.

ब्रॉयलर कोंबडी आधी १२० रुपये प्रति किलोने, गावठी कोंबडी ४३० रुपये प्रति किलोने आणि अंडी प्रति नग ५ रुपये दराने विक्री केले जात होते. आता ब्रॉयलर कोंबडी १४० ते १५० रुपये प्रति किलोने, गावठी कोंबडी ४४० ते ४६० रुपये प्रति किलोने तसेच अंडी प्रति नग ६ रुपये दराने विक्री केले जात आहेत.

कोरोनाच्या संकटानं सामान्यांचं जगणं हैराण केलंय. गेल्या दोन वर्षांत झालेल्या लॉकडाऊनमुळं अनेकांच्या हातचे रोजगार हिरावले गेले. हजारो कुटुंब आर्थिक संकटाच्या खाईत लोटली गेली. आता पुन्हा तिसऱ्या लाटेची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळं पुन्हा लॉकडाऊन होणार का, याची धास्ती अनेकांनाय. यात पेट्रोल, डिझेल, खाद्यतेलाच्या वाढलेल्या दरानं सामान्यांना हैराण केलं आहे. त्यातच १ सप्टेंबरपासून स्वयंपाकाच्या गॅसचे दर महागल्यानं सामान्यांचं आर्थिकदृष्ट्या कंबरडं मोडलं.

या वर्षी १ जानेवारीपासून आतापर्यंत स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दर तब्बल १९० रुपयांनी वाढलेत. विशेष म्हणजे १ मार्च २०१४ पासून तब्बल ४७८ रुपयांची ही वाढय. १ मार्च २०१४ रोजी हे दर ४१० रुपये ५० पैसे होते.

प्रत्येक महिन्याच्या एक आणि पंधरा तारखेनंतर गॅस दरवाढीचं धोरणं तेल कंपन्यांनी स्वीकारलं आहे. गेल्या महिन्यात स्वयंपाकाच्या गॅसचे दर दोनदा वाढले. प्रत्येक वेळेस २५ रुपये म्हणजे ५० रुपयांची वाढ झाली. विशेष म्हणजे जुलै महिन्यात २५.५० आणि मार्च महिन्यातही २५ रुपयांनी स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची दरवाढ झाली आहे.

गॅस सिलिंडर दरवाढीचा फटका व्यावसायिकांनही बसला. व्यावसायिक वापराच्या सिलिंडरचे दर १ सप्टेंबरपासून ७३ रुपयांनी वाढलेत. त्यामुळे एका सिलिंडरसाठी व्यावसायिकांना तब्बल १७०३ रुपये मोजावे लागतायत. आधीच कोरोना टाळेबंदीनं हॉटेल, रेस्टॉरंट बंद होते. आत्ता कुठं सारं सुरळीत सुरू असताना ही दरवााढ झाल्यानं व्यावसायिकांमध्ये संतापाची भावना आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा