Advertisement

ठाणे ते बोरिवली अंतर अवघ्या दहा मिनिटांत पार करता येणार

ठाण्यात अनेक कामांचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले

ठाणे ते बोरिवली अंतर अवघ्या दहा मिनिटांत पार करता येणार
SHARES

ठाणे-बोरिवली बोगद्याला मंजुरी मिळाल्याने ठाणे ते बोरिवली हे अंतर अवघ्या दहा मिनिटांत पार करणे शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यात सांगितले.

ठाणे महापालिका क्षेत्रात राज्य सरकारचे अनुदान आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या ओवळा माजिवडा मतदारसंघातील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

ठाणे शहराला वाहतूककोंडीतून मुक्त करण्याचे काम सुरू असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आपल्या शहरांमध्ये तयार झाले पाहिजेत. मुलांमध्ये कलागुण आहे, त्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.

जनतेच्या पैशातून ही विकासकामे केली जात आहेत. त्यामुळे गुणवत्तेत कोणतीही तडजोड होता कामा नये. ठाणे शहरातील वाहतूककोंडीतून सुटका करण्याचे काम सुरू आहे. तसेच क्लस्टर प्रकल्प संपूर्ण ठाणे आणि मुंबई महानगर क्षेत्रात राबविण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सरकारने नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, शिवडी न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक रोड, मुंबई पुणे महामार्गावरील मिसिंग लिंक आदी प्रकल्पांना चालना दिली. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे ठाणेपर्यंतचे काम लवकरच पूर्ण होणार आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा