Advertisement

'गुलाटी कंपाऊंड' प्रकरणाचे मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश


'गुलाटी कंपाऊंड' प्रकरणाचे मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
SHARES

साकीनाका येथील गुलाटी कंपाऊंड येथील बांधकाम निष्कासीत केलेल्या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लोकशाही दिनी दिले. नागरिकांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रशासनाने लोकशाही दिनाची वाट पाहू नये, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मंत्रालयात ऑनलाईन लोकशाही दिन झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

मुंबई साकीनाका येथील गुलाटी कंपाऊंड येथील रवी रामधनी यादव व त्यांच्या बहिणीचे घर अधिकाऱ्यांनी विकासकाशी संगनमत करुन बेकायदेशीररित्या तोडल्याबाबत तक्रार करण्यात आली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले.

मंत्रालयात ऑनलाईन लोकशाही दिनामध्ये 23 प्रकरणांवर सुनावणी करण्यात आली. यापूर्वीच्या लोकशाही दिनातील प्रलंबित असलेल्या प्रकरणावर तीन दिवसांत कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सामान्य नागरिकांना आपल्या समस्या सोडविण्यासाठी लोकशाही दिनी दाद मागण्याची गरजच पडता कामा नये. प्रशासनाने स्थानिक पातळीवर ते वेळेवर निकाली काढावे.

यावेळी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, मुख्य सचिव सुमीत मल्लिक, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव भगवान सहाय, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, पोलीस महासंचालक सतीश माथूर, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Read this story in हिंदी
संबंधित विषय