Advertisement

बालसुधारगृहात कर्मचाऱ्यांचे आंदोलन


बालसुधारगृहात कर्मचाऱ्यांचे आंदोलन
SHARES

चिल्ड्रेन्स एड सोसायटीकडे शासनाचे दुर्लक्ष असल्याने या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नेहमीच अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे येथील कर्मचारी संघटनेने सोमवारपासून निषेध आंदोलन सुरू केले असून, दंडाला काळी फीत बांधून कर्मचारी कामावर हजर झाले होते. या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कधीही वेळेवर पगार मिळालेला नाही. त्यामुळे अनेकदा त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येते. त्यामुळे यापुढे पगार वेळेवर मिळावेत, संस्थेच्या मुख्याधिकारी पदावर नियमित नेमणूक व्हावी, तसेच विद्यमान मुख्याधिकाऱ्यांच्या मनमानी कामाची चौकशी व्हावी आणि चिल्ड्रेन्स एड सोसायटीचे शासनामध्ये विलीनीकरण व्हावे आदी मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे.

आम्ही अनेकदा आंदोलन केले आहे. मात्र शासनाकडून कोणतीच दखल घेतली जात नाही. त्यामुळे यावेळेस मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन आम्ही सुरूच ठेवणार आहोत.

राजेश निचिते, कर्मचारी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा