Advertisement

लाँग विकेंडमुळे पर्यटकांची अलिबाग, शिर्डी, महाबळेश्वरला पसंती

नाताळ आणि शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशा सलग तीन दिवसांच्या सुट्टीमुळे अनेकांनी लाँग वीकेंडचा प्लॅन केला आहे.

लाँग विकेंडमुळे पर्यटकांची अलिबाग, शिर्डी, महाबळेश्वरला पसंती
SHARES

नाताळ आणि शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशा सलग तीन दिवसांच्या सुट्टीमुळे अनेकांनी लाँग वीकेंडचा प्लॅन केला आहे. परिणामी रस्त्यांवर असणारी वाहतूक कोंडीही वाढत आहे.

(ALIBAUG) अलिबाग, (GANPATIPULE) गणपतीपुळे, (RATNAGIRI) रत्नागिरी अशा समुद्रकिनारी भागांसह (LONAVLA) लोणावळा, (MAHABALESHWAR) महाबळेश्वर आणि (NASHIK)नाशिक अशा ठिकाणी जाणाऱ्यांचीही संख्या अमाप असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे शहरी भागांतही जवळपासच्या मॉल आणि बाजारपेठांमध्ये नाताळच्या निमित्तानं लक्षवेधी झगमगाट आणि गर्दी पाहायला मिळत आहे.

फक्त समुद्रकिनारे आणि थंड हवेची ठिकाणंच नव्हे, तर अनेक पर्यटकांनी सुट्टीच्या या दिवसांसाठी थेट तीर्थक्षेत्रांना भेट देण्याला प्राधान्य दिलं आहे. पंढरपूर, शिर्डी, कोल्हापूरची अंबाबाई अशा मंदिरांमध्ये भाविकांची रिघ पाहायला मिळत आहे.

शिर्डी साईबाबा मंदिर संस्थानच्या वतीनं कोरोना व्हायरसच्या संसर्गाचं गांभीर्य लक्षात घेत भाविकांसाठी ऑनलाईन पासची व्यवस्था केली आहे. असं असलं तरीही इथं सुट्टीच्या निमित्तानं येणाऱ्यांचा आकडा वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

पुढील तीन दिवसांसाठी मंदिर प्रशासनाकडून देण्यात येणारे ऑनलाईन पासही फुल्ल असल्याची बाब समोर आली आहे. तब्बल नऊ महिन्यांनंतर मंदिराची कवाडं खुली झाल्यामुळं सरत्या वर्षाला निरोप देत येत्या वर्षाची सकारात्मक सुरुवात करण्याच्या हेतूनंच भाविकांचे पाय तीर्थक्षेत्रांकडे वळत आहेत.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा