मनपा कार्यालयासमोर साचले पाणी

दहिसर - स्वच्छता राखण्याची जबाबदारी असलेल्या मनपाच्या कार्यालयासमोरच गेल्या अनेक दिवसांपासून घाणेरडे पाणी साचले आहे. लिंक रोड बाबलीपाडा परिसरात मनपाच्या स्वच्छता विभागाचे हे कार्यालय आहे. जागोजागी स्वच्छता राखणे आणि कचरा उचलणे हे या विभागाचे काम आहे. मात्र कार्यालयाच्या समोर साचलेले दूषित पाणी आणि अस्वच्छता याकडे मनपा दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे बाबली पाडात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

 

Loading Comments