पालिकेचे सफाई कर्मचारी आक्रमक

 Kurla
पालिकेचे सफाई कर्मचारी आक्रमक

कुर्ला - कुर्ला एल वॉर्ड परिसरातील पालिकेचे सफाई कर्मचारी आक्रमक झालेत. वेळेत पगार मिळत नसल्यानं हे सफाई कर्मचारी आक्रमक झालेत. त्याचबरोबर सुट्टीच्या दिवशी केलेल्या कामाचे पैसेही त्यांनी वेळेत मिळत नाहीत, तसेच पगारामध्येही फंड कापला जातो. या सफाई कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा 14 हजार आहे मात्र त्यांना फक्त 9 हजार मिळतात. त्यामुळे संतप्त पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला. पालिका या कर्मचाऱ्यांचे पैसे खात असल्याची टीका विजय दळवी यांनी ‘मुंबई लाइव्ह’शी बोलताना केली.

Loading Comments