• महापालिका मार्केटची दुरवस्था
  • महापालिका मार्केटची दुरवस्था
  • महापालिका मार्केटची दुरवस्था
  • महापालिका मार्केटची दुरवस्था
SHARE

मालाड - मालवणीच्या एमएचबी कॉलनी गेट नंबर 7 इथल्या महापालिकेच्या मार्केटची दुरवस्था झालीय. मार्केटच्या भिंतींची झालेली पडझड, तुटलेली गटाराची झाकणं अशी दयनीय अवस्था या मार्केटची झालीय. या मार्केटमधल्या दुकानदारांसाठी ना पिण्याच्या पाण्याची सोय ना शौचालयाची सोय देण्यात आलीय. एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असेल असा प्रश्न भाजपचे उत्तर जिल्हामंत्री जॉन डेनिस यांनी उपस्थित केलाय.

महाराष्ट्र मालवणी मंडई व्यापारी संघटनेच्यावतीनं मार्केटच्या नूतनीकरणची मागणी केली जातेय. यासाठी व्यापाऱ्यांच्या वतीनं खासदार गोपाळ शेट्टी यांनी पी उत्तर पालिका विभागाला पत्र लिहलंय. मार्केटच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मुख्य बाजार व उद्यान विभागाकडे पाठवण्यात आल्याचे पी उत्तर पालिका विभागाकडून सांगण्यात आलंय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या