चेंबूरमध्ये झाडांचे मोफत वाटप

 Chembur
चेंबूरमध्ये झाडांचे मोफत वाटप

चेंबूर - वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी नागरिकांना मोफत झाडे वाटण्यात आली. या वेळी अभिनेत्री ऋतुजा बागवे आणि चिमुकल्यांनी नागरिकांना ही झाडे देत नवीन वर्षांची सुरुवात झाडे लावून करण्याची विनंती केली.

राजा शिवछत्रपती परिवार या संस्थेमार्फत आणि पालिकेचे एम पश्चिम कार्यालय यांच्या वतीने गुरुवारी रेल्वे स्थानकाबाहेर ही झाडे वाटली. या वेळी नागरिकांनी देखील या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद दिला.

Loading Comments