Advertisement

निवडणुकीआधी चकाचक मुंबई


निवडणुकीआधी चकाचक मुंबई
SHARES

मुंबई – मुंबई, स्वच्छ-सुंदर करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने 10 लाख कचरा पेट्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयासंबंधीचा रखडलेला प्रस्ताव आज अखेर स्थायी समितीत मंजुर करून घेण्यात भाजप-शिवसेनेला यश आले. त्यामुळे आता लवकरच कचर्याच्या पेट्यांची खरेदी करत कचर्याच्या 10 लाख पेट्या मुंबईतील विविध परिसरात बसवण्यात येणार आहे. त्यातही निवडणुका डोळ्यासमोर ठेवत निवडणुकीआधी 10 लाख कचर्याच्या पेट्या बसवल्या जाव्यात असा भाजप-शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्यामुळे महिन्याला एक लाखएवजी दोन ते तीन लाख कचऱ्याच्या पेट्या बसवण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूकाआधी मुंबई चकाचक करत मतदारांना आकर्षित करण्याचा भाजप-शिवसेनेचा प्रयत्न असल्याची चर्चा यानिमित्ताने पालिकेत रंगली आहे.

मुंबईत कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. ओला-सुका कचरा कुठेही कसाही फेकला जात असल्याने कचऱ्याचे विभाजन करत कचऱ्याची विल्हेवाट लावणेही प्रशासनाला अवघड होत चालले आहे. त्यातच कचराप्रश्न मार्गी लावण्यासाठी नगरसेवकांना काही लाखांचा निधी देण्यात आला होता. पण नगरसेवकांकडून हा निधी वापरलाच गेला नाही आणि निधी रद्द झाला. यावर उपाय म्हणून पालिकेने स्वत:च कचऱ्याच्या पेट्या खरेदी करत मुंबईतील विविध भागात ओल्या आणि सुक्या कचऱ्याच्या पेट्या बसवण्याचा निर्णय घेतला आहे. 11 कोटी खर्च करत 10 लाख कचरा पेट्या खरेदी केल्या जाणार आहेत. 24 विभागांमध्ये या कचरा पेट्या बसवण्यात येणार आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा