कांदिवलीत राबवली स्वच्छता मोहिम


  • कांदिवलीत राबवली स्वच्छता मोहिम
  • कांदिवलीत राबवली स्वच्छता मोहिम
  • कांदिवलीत राबवली स्वच्छता मोहिम
  • कांदिवलीत राबवली स्वच्छता मोहिम
SHARE

ठाकूर कॉम्प्लेक्स- रविवारी ठाकूर कॉम्प्लेक्स 90 फूट रोड येथे भाजपा उत्तर मुंबई तर्फे स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. मोहिमेअंतर्गत ठाकूर कॉम्प्लेक्स कांदिवली 90 फूट रस्त्याची साफसफाई आणि जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत विद्यार्थी तसेच स्थानिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्वतःला सेवक म्हणणारे पर्सी अंकल उर्फ विजय नय्यर यांच्या नेतृत्वाखाली मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. समाजाची स्वच्छतेकडे बघण्याची मानसिकता बदलण्यासाठी अशा अनेक मोहिम राबवणार असल्याचं पर्सी अंकल यांनी मुंबई लाईव्हशी बोलताना सांगितले. मोहिमेत डॉ. विदुषी अगरवाल यांच्या पुढाकाराने विविध विद्यार्थी ग्रुप सामील झाले होते. तसंच भाजप कार्यकर्ते करूणाकरण शेट्टी, सुधीर परांजपे, विदयानंद पेडणेकर आणि प्रगती इंगळे उपस्थित होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या