Advertisement

शिवसेना-भाजपात चढाओढ: गणेशोत्सव मंडळांच्या ऑनलाईन अर्जांची मुदतवाढ ५ सप्टेंबरपर्यंत


शिवसेना-भाजपात चढाओढ: गणेशोत्सव मंडळांच्या ऑनलाईन अर्जांची मुदतवाढ ५ सप्टेंबरपर्यंत
SHARES

गणेशोत्सवाच्या मुद्दयावरून शिवसेना आणि भाजपात राजकारण सुरु झालंय. गणेशोत्सव मंडळांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ३१ ऑगस्टची शेवटची तारीख होती. परंतु शिवसेनेच्या मागणीनुसार महापौरांनी ही तारीख प्रशासनाकडून २ सप्टेंबरपर्यंत वाढवून घेतली. परंतु महापौरांनी ही मुदतवाढ मिळवून घेतल्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या मदतीनं ही मुदतवाढ ५ सप्टेंबरपर्यंत वाढवून घेतली. त्यामुळे प्रशासन हे महापौरांच्या नव्हे, तर मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर चालत असल्याचं पुन्हा एकदा भाजपानं दाखवून दिलं आहे.


महापौरांची घोषणा

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपाच्या परवानगीचे अर्ज करण्याची तारीख २ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. उपनगर सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे पदाधिकारी शिवसेना नेते लिलाधर डाके आणि उपनेते विनोद घोसाळकर यांच्या मागणीनंतर प्रशासनाने याची दखल घेऊन ३१ ऑगस्ट ऐवजी २ सप्टेंबर अशी तारीख वाढवून दिली होती. परंतु एकच दिवस उलटत नाही तोच ही तारीख २ सप्टेंबर ऐवजी आता ५ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यासह गणेशोत्सव मंडळांना दिलासा देणारे महत्वाचे निर्णय गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले.


अतिथीगृहावर बैठक

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांच्याप पुढाकाराने गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवाबाबत महत्वाची बैठक घेतली. या बैठकीला गृह विभागाचे सचिव, पोलिस महासंचालक, मुंबई व ठाण्यााचे पोलिस आयुक्त , महापालिका व एमएमआरडीएचे आयुक्त व संबधित सर्व शासकीय यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी तसंच बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वीय समितीचे अध्य्क्ष अॅड. नरेश दहिबावकर, गणेशोत्सव समन्वय महासंघाचे अध्य्क्ष जयेंद्र साळगावकर, उपाध्यक्ष व पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, प्रमुख कार्यवाह सुरेश सरनौबत, किरण खानोलकर आदी उपस्थित होते.


गुन्हे मागे घेण्याचे निर्देश

या बैठकीत गणेशोत्सव मंडळांना परवानगीसाठी अर्ज करण्याची मुदत ५ सप्टेंसबरपर्यंत वाढविण्याीचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. तसंच गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांवरील गणेशोत्स‍व साजरा करण्यावरून दाखल करण्यारत आलेले गुन्हे मागे घेण्याबाबत गठीत करण्यात आलेल्या उपसमितीला गुन्हेे मागे घेण्याबाबत सांगण्यात येईल. याशिवाय यावर्षी अर्ज करताना त्या सोबत सादर केलेली कागदपत्रे डिजिटल पद्धतीने संग्राह्य करण्यात येतील. ज्यामुळे मंडळांना पुन्हा पुन्हा संबंधित कागदपत्रे दरवर्षी सादर करावी लागणार नाहीत.


एकाच अर्जात सर्व परवानग्या

मंडळांना सध्याच्या स्थितीत ६ वेगवेगळया परवानग्या घ्याव्या लागातात. त्या एकाच ठिकाणी एकाच अर्जात मिळण्यााची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. तसंच ज्यांचे परवानगी अर्ज यावर्षी रद्द झाले आहेत त्या मंडळांशी चर्चा करून त्यांना कायदेशीर मार्गाने परवानगी कशी देता येईल याबाबत चर्चा करून मार्ग काढण्याचाही सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे समन्वयक उपायुक्त नरेंद्र बर्डे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मुख्यमंत्री स्तरावर अशाप्रकारचा निर्णय घेऊन ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत ५ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.


गुरूवारपर्यंत गणेशोत्सव मंडळांना दिलेली परवानगी

  • एकूण परवानगीसाठी आलेले अर्ज: २८४३
  • रद्द झालेले मंडळांचे अर्ज: ६३८
  • मंडळांना दिलेली परवानगी: १७६६
  • महापालिका, पोलिसांच्या छाननीत बाद अर्ज: २३७
  • महापालिकेकडे प्रलंबित अर्ज: २०२



हेही वाचा-

मुंबईतील २२३ गणेशोत्सव मंडळांचे अर्ज नाकारले!

इको फ्रेंडली मखरांनी सजला वनमाळी सभागृह



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा