Advertisement

इको फ्रेंडली मखरांनी सजला वनमाळी सभागृह


इको फ्रेंडली मखरांनी सजला वनमाळी सभागृह
SHARES

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे गणेश भक्तांनी बाजारात बाप्पांच्या सजावाटीसाठी लागणाऱ्या साहित्यांच्या खरेदीला सुरुवात केली आहे. त्यातच मखर विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या दादरमधील वनमाळी सभागृहात गणेशभक्तांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही गर्दी केली आहे.

यंदा राज्य शासनाने प्लास्टिक आणि थर्माकोलवर बंदी आणली आहे. त्यामुळे वनमाळी सभागृहात इको फ्रेंडली मखरांच्या विक्रीला सुरुवात झाली आहे. मात्र, गणेशभक्तांची थर्माकोलच्या मखरांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे इको फ्रेंडली मखरांची विक्री कमी होत आहे.


इकोफ्रेंडली मखर खरेदी बंधनकारक

मुंबईतील बाजारपेठेत गणेशाच्या मूर्ती आणि सजावटीचे सामन दिसू लागले आहेत. यात नाविन्यपूर्ण काही तरी शोधण्याचा प्रयत्न गणेशभक्तांनकडून केला जात आहे. सादरणतः सजावटीच्या सामनातील मुख्य असलेल्या मखर खरेदीला सुरुवात झाली आहे. मात्र, यंदा प्लास्टिक तसेच थर्माकोलला बंदी आसल्यानं या गणेशभक्तांना इकोफ्रेंडली मखर खरेदी करणं बंधनकारक आहे.

इकोफ्रेंडली मखर हे रंगीबेरंगी कपडे, कागद, लाकूड, पुठ्ठा, रबर सीट, सनमाइका आणि आर्टिफिशीअल फूलं, मण्यांची तोरण, फुलांच्या माळा यांनी तयार केलेले आहेत. या इको फ्रेंडली मखरांची किंमत ४ हजारांपासून ते ८ हजारपर्यंत आहे.

प्लास्टीक बंदीच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. गणेश भक्तांकडून गेल्या वर्षापर्यंत थर्माकोलच्या मखरांना मोठी मागणी येत होती. त्याचप्रमाणे यंदाही येत आहे. मात्र, इको फ्रेंडली मखरांची किंमत थर्माकोलच्या मखरांपेक्षा जास्त असल्यामुळं लोकांचा या मखरांना खूप कमी प्रतिसाद मिळत आहे.
- संदेश दबडे, हरदेव आर्टस्

मुंबईसह राज्यभरात गणपती बाप्पांच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. त्याचप्रमाणं पर्यारणाची हानी होणार नाही, यासाठी गणेशभक्तांची शाडूच्या मूर्तींना पसंती मिळताना दिसत आहे. तसंच सामाजिक आणि पर्यावरणपुरक विषय घेऊन देखावे करत आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा