Advertisement

ग्राहकांना हवेत इको फ्रेंडली मखर


ग्राहकांना हवेत इको फ्रेंडली मखर
SHARES

गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे दादरमध्ये सध्या बाप्पाच्या सजावटीसाठी धावपळ सुरू झाली आहे. सजावटीची मुख्य गोष्ट म्हणजे गणपतीचे मखर. मखर खरेदीसाठी भाविकांनी दादरमध्ये गर्दी केली आहे. पण यावेळी ग्राहक इको फ्रेंडली गणपतीप्रमाणेच इको फ्रेंडली मखरांच्या शोधात आहेत.     

सध्या दादरची छबिलदास गल्ली माखरांनी सजली आहे. चकमकीत, वेगवेगळ्या आकाराचे मखर ग्राहकांना आकर्षित करत आहेत. मात्र हे मखर थर्माकोलचे असल्याने ग्राहकांची चांगलीच निराशा होत आहे. दादरमध्ये थर्माकोलच्या मखराचे 7 ते 8 स्टॉल लागले आहेत. गेल्या 2 महिन्यांपासून या मखर बनवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. 2 हजारांपासून ते 15 हजारापर्यंत या मखरांची किंमत आहे.


यावर्षी मखर खरेदीला बघावे तितका प्रतिसाद मिळताना दिसत नाही. माखरांच्या किमती या गेल्यावर्षीच्या तुलनेत जास्त वाढल्या नाही. आम्ही ग्राहकांना हव्या त्या डिझाईनचे मखर बनवून देतो. पण यावर्षी ग्राहक आमच्याकडे इको फ्रेंडली माखरांची मागणी करत आहेत.
- राजीव कुमार, विक्रेता

दादरच्या छबिलदास गल्लीत येऊन आमचा हिरमोड झाला आहे. एकतर या गल्लीत केवळ थर्माकोलचेच मखर मिळत आहेत. त्याचे भावही खूप जास्त आहेत. आम्हाला इको फ्रेंडली मखर हवे आहे.
- राधिका सुरवंशी, ग्राहक


हेही वाचा - 

इको फ्रेंडली गणपतीचा यशस्वी प्रयोग


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा