Advertisement

बाप्पांच्या आभूषणांनी सजलं दादर !


SHARES

आठवड्याभरात लाडक्या बाप्पांचं आगमन होणार आहे. मग भक्तांची लगबग सुरु होणार नाही तरच नवल ! आणि गणेशोत्सवाची ही लगबग दादर बाजारपेठेत अगदी सहज दिसून येते. बाप्पांच्या स्वागतापासून ते विसर्जनापर्यत लागणा-या सर्व वस्तूंनी बाजारपेठा सजल्यात. गणपतीची आरास करण्यासाठी विविध प्रकारची मखर, फुलांच्या कमानी, प्लॅस्टिकच्या फुलांचे हार आणि तोरणांबरोबरच सजावटीच्या इलेक्ट्रिक वस्तूंनाही मोठी मागणी आहे. 50 रूपयांपासून 3 हजारांपर्यंत किंमती असलेल्या हारांचे वेगवेगळे प्रकार ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. फुलदाणी, विविध प्रकारची कापडी व प्लॅस्टिकची फुलं, तोरणं, आरतीचं डिझायनर ताट, पडदे अशा वस्तूही दादरच्या मार्केटमध्ये आकर्षणाचा विषय ठरल्यात. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा