Advertisement

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास सुरू राहणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

संचारबंदीमुळे (curfew) जनतेची होणारी गैरसोय लक्षात घेऊन राज्यात सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने २४ तास (24 hrs open) उघडी ठेवण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी गुरूवारी सायंकाळी केली.

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास सुरू राहणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
SHARES

संचारबंदीमुळे (curfew) जनतेची होणारी गैरसोय लक्षात घेऊन राज्यात सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने २४ तास (24 hrs open) उघडी ठेवण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी गुरूवारी सायंकाळी केली.

कोरोनाच्या (COVID-19) पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी वर्षा निवासस्थानी मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला. 

गैरसोयींचा विळखा

कोरोना व्हायरसचा (coronavirus) फैलाव रोखण्यासाठी देशभरात १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्रातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. सरकारने संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा (essential good) सुरू ठेवल्या असल्या तरी जनतेची मोठी गैरसोय होत आहे. अन्नधान्य, भाजीपाला, स्वयंपाकांच्या गॅसपासून ते औषधापर्यंत इतर सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बाजारपेठेत होत असला, तरी तो नेहमीसारखा सुरळीत होत नसल्याने जनतेला अडचणींना सामोरं जावं लागत आहे. 

बाजारात मोठी गर्दी

एका बाजूला घराबाहेर पडण्याची मर्यादा तर दुसऱ्या बाजूला बाजारात जीवनावश्यक वस्तूंची कमतरता अशा दुहेरी कात्रीत जनता सापडली आहे. वस्तू आज मिळतेय तर घेऊन ठेवा उद्याचा भरवसा नाही, अशा मानसिकतेतून मिळेत त्या ठिकाणाहून वस्तू करण्यासाठी लोकं पळत आहेत. यामुळे एकाच ठिकाणी मोठी गर्दी देखील उसळत आहे. अशा गर्दीमुळे पुन्हा एकदा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

जीवनावश्यक वस्तू जनतेला सुरळीतपणे उपलब्ध होण्यासाठी सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने यांना २४ तास उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 

मात्र संबंधित दुकानांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. दोन ग्राहकांमधील अंतर, निर्जंतुकीकरण, स्वच्छता या बाबत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शन सूचना पाळाव्या लागतील, असं आवाहनही त्यांनी दुकानदारांना केलं आहे. 


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा