Advertisement

CNG आणि PNG च्या किंमतीत वाढ, जाणून घ्या नवे दर

सहा आठवड्यात तिसऱ्यांदा ही वाढ झाली आहे.

CNG आणि PNG च्या किंमतीत वाढ, जाणून घ्या नवे दर
SHARES

महानगर गॅसनं सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ केली आहे. सहा आठवड्यात तिसऱ्यांदा वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसणार आहे.

महानगर गॅसनं (Mahanagar gas) मुंबईत सीएनजी प्रतिकिलो ३ रुपये ६ पैशांनी तर पीएनजी २ रुपये ६ पैशांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून ही दरवाढ लागू होणार आहे.

नव्या दरानुसार मुंबईत एक किलो सीएनजीसाठी ६१ रुपये ५० पैसे तर एक किलो पीएनजीसाठी ३६ रुपये ५० पैसे मोजावे लागणार आहेत. गेल्या दोन महिन्यातील सीएनजी आणि पीएनजीमधली ही तिसरी दरवाढ आहे.

दररोजच्या भाववाढीमुळे देशातील महागाईचा उच्चांक दिसून येत आहे. सर्वच वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलेंडरही (gas cylinder) ९०० रुपयांच्या पुढे गेलाय. तर पेट्रोलनं केव्हाच शंभरी पार केली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नैसर्गिक वायूच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे एमजीएलच्या इनपुट गॅसच्या किमतीतही लक्षणीय वाढ झाली आहे. गॅसच्या इनपुट खर्चातील वाढ अंशतः भरून काढण्यासाठी सीएनजीच्या मूळ किमतीत वाढ केली जात आहे.



हेही वाचा

अग्निसुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ९० इमारतींना नोटीस

लग्नसोहळे, पार्ट्यांवर मुंबई महापालिकेची नजर

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा