Advertisement

लग्नसोहळे, पार्ट्यांवर मुंबई महापालिकेची नजर

लग्न समारंभातील गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेनं (BMC) तयारी केली आहे.

लग्नसोहळे, पार्ट्यांवर मुंबई महापालिकेची नजर
SHARES

सध्या लगीनसराईचा महिना सुरू झाला आहे. कोरोना (Coronavirus) निर्बंध शिथिल झाल्यानंतर या लग्न सोहळ्यांत गर्दी होण्याची शक्यता आहे. गर्दी झाल्यास कोरोना (Corona) वाढवण्याचा धोका आहे.

हिच गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेनं (BMC) तयारी केली आहे. लग्नसोहळे आणि डिसेंबरमध्ये होणाऱ्या पार्ट्यांवर मुंबई पालिका नजर ठेवणार आहे.

लग्न समारंभ (Wedding) तसंच डिसेंबरमध्ये हॉटेल-रेस्टॉरंट, बारमध्ये होणाऱ्या इअर एंड पार्ट्यांवर नजर ठेवण्यासाठी प्रत्येक प्रभागांत पालिकेची दोन भरारी पथके तैनात केली जाणार आहेत. कोरोना नियमावलीचा कुठेही भंग झाल्याचं निदर्शनास आल्यास जागच्या जागी कारवाई होणार आहे.

कारवाईसाठी पोलिसांचीही मदत घेतली जाणार आहे. सध्या लग्न सोहळ्यासाठी दोनशे जणांची उपस्थिती किंवा हॉलच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजित करण्याचं बंधन घालण्यात आलं आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. त्यामुळे तिसरी लाट टळली असल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे. परंतु, कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली असली तरी काळजी घेणं अत्यंत आवश्यक असल्याचंही तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे.



हेही वाचा

कोरोनाची तिसरी लाट 'या' महिन्यात येऊ शकते, पण... - राजेश टोपे

मुंबईतील सीलबंद इमारतींमध्ये ७४ टक्क्यांनी घट

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा