Advertisement

मुंबईतील सीलबंद इमारतींमध्ये ७४ टक्क्यांनी घट

यावरूनच शहरातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाल्याचं दिसून येतं आहे.

मुंबईतील सीलबंद इमारतींमध्ये ७४ टक्क्यांनी घट
(Representational Image)
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) नुकत्याच उघड केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात मुंबईतील सील केलेल्या इमारतींची संख्या अनुक्रमे ७४ टक्क्यांनी घसरली आहे. यामुळे शहरातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाल्याचं दिसून येतं आहे.

तर, त्याच कालावधीत सीलबंद मजल्यांची संख्या ५० टक्क्यांनी कमी झाली आहे. २२ नोव्हेंबर २०२१ पर्यंत संपूर्ण शहरात फक्त १३ इमारती सील केल्या आहेत. २३ ऑक्टोबरच्या तुलनेत ही मोठी घसरण आहे, ज्यात ४३ इमारती सील करण्यात आल्या होत्या.

दरम्यान, त्याच कालावधीत सीलबंद मजल्यांची संख्या १,६०९ वरून १,०४७ वर आली आहे. याव्यतिरिक्त, होम क्वारंटाईनमध्ये असलेल्या मुंबईकरांची संख्या २२ ऑक्टोबर रोजी ६३,२७९च्या तुलनेत सध्या ४०,२१६ इतकी आहे.

प्रशासकिय संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सील केलेल्या इमारती आणि मजल्यांची संख्या कमी होणे आश्चर्यकारक नाही कारण शहरात प्रकरणे कमी होत आहेत.

ऑक्टोबरमध्ये, होम क्वारंटाईन अंतर्गत ७०,००० हून अधिक रहिवासी होते. २२ नोव्हेंबरपर्यंत ही संख्या केवळ ४०,००० वर घसरली आहे.

तथापि, पालिका डिसेंबरमध्ये सतर्क राहणे सुरू ठेवेल. कारण परदेशी प्रवाशांमध्ये लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. सणानंतर प्रकरणे वाढू शकतात, असा अंदाज यापूर्वी वर्तवण्यात आला होता.

पालिकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पाच किंवा त्याहून अधिक रहिवाशांची COVID-19 साठी पॉझिटिव्ह चाचणी झाल्यास प्रशासकिय संस्था इमारत सील करते. कमी असल्यास, रुग्ण जिथं राहतो तो मजला बंद केला जातो.

पहिल्या आणि दुसर्‍या लाटेच्या दरम्यान, प्रवेश आणि बाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यासाठी सीलबंद इमारतींच्या बाहेर काही वेळा पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.



हेही वाचा

मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो, चिकनगुनियाची रुग्ण संख्या तिप्पट

मुंबईत ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये कोविड रुग्ण ५०% कमी

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा