Advertisement

मुंबईत ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये कोविड रुग्ण ५०% कमी

ऑक्टोबरमध्ये याच कालावधीत नोंदवलेल्या रुग्णांच्या संख्येपेक्षा नोव्हेंबरमध्ये कमी रुग्ण आहेत.

मुंबईत ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये कोविड रुग्ण ५०% कमी
SHARES

नोव्हेंबरच्या मागील २० दिवसांत, मुंबईत कोविड-१९च्या रुग्णांची नोंद ५०% कमी झाली आहे, जी ऑक्टोबरमध्ये याच कालावधीत नोंदवलेल्या रुग्णांच्या संख्येपेक्षा कमी आहे.

१ ते २० नोव्हेंबर दरम्यान मुंबईत एकूण ४,८९२ रुग्ण नोंदवले गेले, तर ऑक्टोबरमध्ये याच कालावधीत शहरात ९,८२३ कोविड -१९ रुग्ण आढळले.

दरम्यान, रविवारी, राज्य सरकारनं कोविड पोर्टलशी डेटाची तुलना करताना मुंबईतील पॉझिटिव्ह प्रकरणांचा ताळमेळ साधला. मुंबईतील एकूण कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ५४७ नं घट झाली आहे. रविवारी मुंबईत २१२ रुग्ण नोंदवली गेली. ज्यामुळे आतापर्यंतचा कोरोना रुग्णांचा आकडा ७,६१,३०६ घरात गेला आहे.

संपूर्ण नोव्हेंबरमध्ये, मुंबईत १० नोव्हेंबर वगळता दररोज ३०० पेक्षा कमी कोविड रुग्ण आढळले. फक्त १० नोव्हेंबरला ३३९ रुग्ण नोंदवली गेली होती. तर ३ नोव्हेंबर रोजी, एका दिवसात ३१९ रुग्ण नोंदवली गेली.

रविवारी मुंबईतही ३ मृत्यूची नोंद झाली असून, मृतांची संख्या १६,३०६ झाली आहे. शहरातील मृत्यूचे प्रमाण २.१% आहे.

मुंबईत २० नोव्हेंबर रोजी (१८८ रुग्ण), १५ नोव्हेंबर (१८२ रुग्ण), आणि ६ नोव्हेंबर रोजी (१७६ रुग्ण) २०० पेक्षा कमी कोविड रुग्णांची नोंद झाली. नोव्हेंबरमध्ये प्रकरणांमध्ये घट झाल्यानं, कोविड रुग्णांचा एकूण वाढीचा दर मुंबईसाठी ०.०३% इतका कमी झाला आहे.

आतापर्यंत, शहरात एकूण १२,१४०,६४७ चाचण्या घेण्यात आल्या आहेत. सकारात्मकता दर ६.२% आहे. शनिवारी, मुंबईत ३१,८०१ कोविड-19 चाचण्या घेण्यात आल्या आणि दिवसभराचा सकारात्मकता दर ०.६% होता.

पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रभारी अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, “आमच्याकडे दररोज कमी रुग्ण आढळत आहेत आणि हे मुंबईसाठी सकारात्मक लक्षण आहे. ऑगस्टनंतर लोकल गाड्या सुरू झाल्या आणि गणेशोत्सव, नवरात्री, दिवाळी यांसारखे अनेक सण देखील येऊन गेले. तरी कुठल्याही परिस्थितीसाठी प्रशासन तयार होते. नागरिकांचे सहकार्य आणि मोठ्या प्रमाणात लसीकरणामुळे मुंबईत रुग्णांच्या संख्येत घसरण झाली आहे.”



हेही वाचा

ठाणे महानगरपालिकेची डोर टू डोर लसीकरण मोहीम ठरतेय वरदान

मुंबईतल्या 'या' भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा