Advertisement

मुंबईतल्या 'या' भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम

सलग दुसऱ्या दिवशी, मुंबईच्या काही भागांमध्ये पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

मुंबईतल्या 'या' भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम
SHARES

सलग दुसऱ्या दिवशी, मुंबईच्या काही भागांमध्ये पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. यामध्ये वांद्रे, खार आणि सांताक्रूझचा समावेश आहे. रविवारी देखील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला होता. तर सोमवारी देखील असाच परिणाम पाहायला मिळेल. 

वांद्रे आणि खारच्या काही भागात पुरवठा कमी झाला आहे किंवा पाण्याचा अत्यंत कमी दाब आहे. माहीम खाडीतील १,८०० मिमी तानसा पूर्व जलवाहिनीतील गळतीमुळे ही पाणी कपातीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. गळतीचं पूर्णपणे निराकरण झालं नाही, असा दावा अधिकार्‍यांनी केला आहे.

हायड्रॉलिक विभागातील एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, त्यांनी काम पूर्ण केलं. पण नंतर त्यांना समजलं की समस्या पूर्णपणे सोडवली गेली नाही.

त्यामुळे रविवारी कमी दाबानं पाणीपुरवठा करण्यात आला. पूर्ण दाबानं पाणी सोडण्यात काही अर्थ नाही, असं या अधिकाऱ्याचं मत होतं. सोमवारी ते पुन्हा एकदा गळतीची समस्या सोडवण्याचं काम हाती घेतलं आहे.

अहवालानुसार, आजुबाजूच्या रहिवाशांनी पाण्याच्या टाक्यांसाठी भरावे लागणाऱ्या अवाजवी शुल्काबाबत तक्रार केली आहे.

माहीम खाडीवर तानसा पूर्व आणि पश्चिम असे दोन मुख्य मार्ग कसे आहेत हे वांद्र्याच्या एका नगरसेवकानं स्पष्ट केले. याचा फटका स्थानिकांना बसत असल्यानं स्थानिक नेते प्रशासकिय प्राधिकरणानं या समस्येकडे तातडीनं लक्ष देण्याची विनंती करत आहेत.



हेही वाचा

एसी लोकलच्या आणखी ८ फेऱ्या पश्चिम रेल्वे मार्गावर सुरू

कामावर रुजू झालेले 'इतके' एसटी कर्मचारी पुन्हा संपात

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा