Advertisement

कामावर रुजू झालेले 'इतके' एसटी कर्मचारी पुन्हा संपात

आपल्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. या कर्मचाऱ्यांचं मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे.

कामावर रुजू झालेले 'इतके' एसटी कर्मचारी पुन्हा संपात
SHARES

आपल्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. या कर्मचाऱ्यांचं मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. विशेषे म्हणजे कामावर रुजू झालेले एसटी कर्मचारी मोठ्या संख्येन संपात उतरले आहेत. रविवारी ३,१७१ कर्मचारी पुन्हा संपात सहभागी झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे संपात सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ८८,१२२ झाली आहे.

संपकऱ्यांवर शक्य ती कारवाई करत वाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न महामंडळाकडून सुरू आहेत. मात्र या प्रयत्नांना अद्याप यश आले नाही. रविवारी दुपारपर्यंत १४ प्रशिक्षणार्थी कामगारांना नियुक्तीपत्र देत महामंडळानं कामावर हजर करून घेतले. कामगारांच्या विलीनीकरणाऱ्या मागणीसाठी परिवहनमंत्री अनिल परब सकारात्मक असताना महामंडळाकडून मात्र एसटी संप चिरडून टाकण्याचे उपाय सुरूच आहेत, असा आरोप आझाद मैदानात बसलेल्या कर्मचाऱ्यांनी केला आहे.

या निषेधार्थ चालक-वाहकांसह कार्यशाळा आणि प्रशासकीय प्रवर्गातील एकूण ३,१७१ कर्मचारी पुन्हा संपात दाखल झाले. 'चलो मुंबई'चा नारा देत आझाद मैदानात आंदोलक जमा होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी कामावर हजर झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ४,१४४ असून संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ८८,१२२ आहे. शनिवारी हजर कर्मचाऱ्यांची संख्या ७.३१५ आणि संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ८४,९५१ होती.

राज्यात १४ प्रशिक्षणार्थी कामगारांना नियुक्तीपत्र देत महामंडळाने १४ बस रस्त्यावर उतरवल्या. मात्र यातून अवघ्या ४० प्रवाशांनी प्रवास केला. शिवशाही-शिवनेरीच्या १६७ कंत्राटी बसच्या माध्यमातून ४,६१९ प्रवाशांनी प्रवास केल्याचे महामंडळाने सांगितले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा