Advertisement

कोरोनाची तिसरी लाट 'या' महिन्यात येऊ शकते, पण... - राजेश टोपे

पहिली लाट सप्टेंबर २०२० मध्ये आली होती. दुसरी एप्रिल २०२१ मध्ये आली होती.

कोरोनाची तिसरी लाट 'या' महिन्यात येऊ शकते, पण...  - राजेश टोपे
SHARES

महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री, राजेश टोपे यांनी सांगितलं की, कोविड-१९ ची तिसरी लाट डिसेंबरमध्ये राज्यात येण्याची शक्यता आहे, तथापि, ती सौम्य असेल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. वृत्तानुसार, टोपे यांनी साथीच्या रोगशास्त्रज्ञांच्या अंदाजांवरून हे वक्तव्य केलं आहे.

पहिली लाट सप्टेंबर २०२० मध्ये आली होती. दुसरी एप्रिल २०२१ मध्ये आली होती, तिसरी लाट डिसेंबरमध्ये येण्याची शक्यता आहे.

टोपे म्हणाले की, महाराष्ट्रात लसीकरणाचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे ही लाट सौम्य असण्याची शक्यता आहे. राज्यात ८० टक्क्यांहून अधिक व्यक्तींना लस टोचण्यात आली आहे.

पुढे, टोपे यांनी विषाणूचा प्रसार रोखण्यात कोविड-19 लसीकरणानं कशी महत्त्वाची भूमिका बजावली आहे हे स्पष्ट केलं. त्यांनी दावा केला की, संसर्ग कमी आहे आणि मृत्यूचे प्रमाण जवळजवळ शून्य आहे. यासोबतच तरुण आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिकारशक्ती निर्माण होते, असा त्यांचा विश्वास आहे.

डिसेंबरमध्ये तिसरी लाट अपेक्षित असताना, लसीकरणामुळे संसर्ग सौम्य असेल आणि आयसीयू आणि ऑक्सिजनची गरज कमी असेल, असं त्यांनी नमूद केलं. महाराष्ट्रात लसींबाबत बोलताना ते म्हणाले की, त्यांची कमतरता नाही.

टोपे यांनी नमूद केलं की राज्यात अतिरिक्त लसी आहेत. सध्या १.७७ कोटी लसी उपलब्ध आहेत. ते पुढे म्हणाले की कोवॅक्सिनचा साठा ६४ लाख आहे आणि कोविशील्डचा साठा १.१३ कोटी आहे.हेही वाचा

मुंबईतील सीलबंद इमारतींमध्ये ७४ टक्क्यांनी घट

कोरोनानंतर 'या' आजाराचा धोका? २ जणांचा मृत्यू

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा