Advertisement

सायन रुग्णालयात प्रसुतीगृहात झुरळांचा सुळसुळाट


सायन रुग्णालयात प्रसुतीगृहात झुरळांचा सुळसुळाट
SHARES

मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याच्या वेळी रुग्णांना दिले जाणारे कपडे न मिळाल्यानं ४० शस्त्रक्रिया रद्द झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी उजेडात आली होती. त्यानंतर नुकतंच सायन रुग्णालयातील प्रसुतीगृहात झुरळांचा सुळसुळाट असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काही दिवसांपूर्वी सायन रुग्णालयातील झुरळांचा वावर असल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे सायन रुग्णालयाच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.


रुग्णांचं आरोग्य धोक्यात

सायन रुग्णालयाच्या प्रसुतीगृहात झुरळांचा सुळसुळाट होत असल्याचं दिसून येत असून याबाबत सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. या व्हीडिओत बाळाच्या रडण्याचा आवाज येत असल्यानं हा प्रसुतीगृहातला असल्याचं समोर आलं आहे. रुग्णालयात रुग्णाच्या बेडच्या बाजूला औषध आणि रुग्णाचे समान ठेण्यासाठी दिलल्या ड्रॉवरमध्ये असंख्य झुरळांचा सुळसुळाट झाल्याचं दिसून येत असून यामुळं बाळंतीण आणि बाळ यांचे आरोग्य धोक्यात असल्याचं दिसून येत आहे.

सायन रुग्णालयात प्रसुतीगृहात १० व १५ क्रमांकाच्या वॉर्डमध्ये बेडपासून फरशीकडून सगळीकडे झुरळं असल्याचं समोर आलं आहे. प्रसुती विभागातील झुरळांमुळं प्रसुती झाल्यानंतर विश्रांती घेण्याऐवजी आईला बाळासाठी पाहारा ठेवण्याची वेळ येतं आहे.

काही वर्षांपूर्वी एका रुग्णालयात रुग्णाला उंदीर चावल्यानं सर्व रुग्णालयात पेस्ट कंट्रोल करून घ्यावं असं सांगण्यात आलं होतं. मात्र तरीही याकडे रुग्णालय प्रश्न दुर्लक्ष करत असल्याचं या घटनेमुळे उघडकीस आलं आहे. यासर्व प्रकरणाबाबत बुधवारी पालिकेच्या आरोग्य विभागात तक्रारी दाखल करण्यात आल्या असून याची दखल घेत रुग्णालय प्रशासनाकडून २४ तासात पेस्ट कंट्रोल करण्यात येणार आहे.
- सहिदा खान, नगरसेविका, कुर्ला

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा