Advertisement

मुंबईत रात्री गारवा अधिक जाणवणार

चंक्रीवादळामुळे हवामानात बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मुंबईत रात्री गारवा अधिक जाणवणार
SHARES

अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या संभाव्य चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील हवामानात लवकरच बदल होणार आहेत. भारतीय हवामान विभागाने चक्रीवादळ येणार असल्याचा इशारा दिला आहे. अरबी समुद्रात सध्या कोणतेही चक्रीवादळ नाही पण हवामान तज्ज्ञ कमी दाबाच्या क्षेत्रावर लक्ष ठेवून आहेत, जे येत्या काही दिवसांत चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकते. 

चक्रीवादळाची तीव्रता वाढल्यास मुंबई, पुणे आणि दक्षिण कोकण विभागातील हवामानावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. येत्या ४८ तासांत दक्षिण-पूर्व आणि लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र 21 ऑक्टोबरच्या सुमारास मध्य अरबी समुद्रात चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे.

चक्रीवादळाचा परिणाम म्हणून, मुंबई आणि राज्यातील इतर ठिकाणी रात्रीचे तापमान 22-23 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. 22-25 ऑक्टोबरच्या आसपास तापमान 16-17 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. मुंबईसोबतच पुण्यातही तापमानात घट होईल. दुसरीकडे चक्रीवादळामुळे दक्षिण कोकणात पाऊस पडू शकतो.



हेही वाचा

वाढत्या प्रदूषणामुळे मास्क वापरण्याचे पालिकेचे आवाहन

मुंबईतील 'या' 15 रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा