
व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात सुमारे 183 रुपयांची, तर 5 किलोच्या फ्री ट्रेड एलपीजी सिलेंडरच्या दरात सुमारे 13 रुपयांची कपात करण्यात आली आहे.
यासोबतच, देशांतर्गत विमान सेवांसाठी लागणाऱ्या 'एव्हिएशन टर्बाइन फ्युएल'च्या दरात प्रति लिटर 5 रुपयांची कपात करून ते 110 रुपये प्रति लिटर करण्यात आले आहेत.
मात्र, घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांशिवाय, देशात 7 हजारांहून अधिक पेट्रोल पंप चालवणाऱ्या खाजगी तेल कंपनी 'नायरा एनर्जी'ने देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली आहे.
कंपनीने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 5 रुपये आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांनी कपात केली आहे.
26 मार्च रोजी संकटकाळात वाढवलेले दर आता पूर्ववत करण्यात आले आहेत.
कंपनीने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 5 रुपये आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांनी कपात केली आहे.
26 मार्च रोजी अमेरिका - इराण युद्धादरम्यान वाढवलेले दर आता पूर्ववत करण्यात आले आहेत.
7 मार्चपासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत चार टप्प्यांत वाढ झाली होती आणि हा दर 1,345 रुपयांपर्यंत पोहोचला होता.
मात्र, आता पुरवठा परिस्थिती सुधारल्यामुळे केंद्र सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाने 25 जून रोजी औद्योगिक आणि व्यावसायिक एलपीजीचा पुरवठा पूर्ववत केला आहे.
पुरवठ्यातील सुधारणेमुळेच ही दरवाढ मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या महिन्यात सरकारने 'एटीएफ' (ATF) किंमत स्थिरीकरण योजना जाहीर केली होती.
या योजनेंतर्गत सहभागी विमान कंपन्या तीन वर्षांपर्यंत 115 रुपये प्रति लिटर या निश्चित दराने इंधन खरेदी करू शकतात.
एटीएफची जागतिक किंमत 86.32 रुपये प्रति लिटरच्या बेस रेटपेक्षा वाढली आहे.
तसेच सरकार तेल कंपन्यांना बिनव्याजी आगाऊ रक्कम देऊन ही तफावत भरून काढणार आहे.
दर कमी झाल्यास अतिरिक्त रक्कम सरकारकडे जमा केली जाईल.
मुंबईत (mumbai) 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 182 रुपयांची कपात झाली आहे. मात्र आता तो 2,885 रुपये झाला आहे.
हेही वाचा
