Advertisement

मुंबईकरांवर करवाढीचं ओझं नाहीच, जुन्याच योजनांचा गाढा पुढे


मुंबईकरांवर करवाढीचं ओझं नाहीच, जुन्याच योजनांचा गाढा पुढे
SHARES

मुंबईकरांसाठी कोणत्याही नव्या योजना तसेच प्रकल्प हाती न घेता पुन्हा एकदा जुन्याच प्रकल्पांना गती देणारा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. कोणतीही दरवाढ आणि करवाढ सूचित करण्यात आलेली नाही. मागील अर्थसंकल्प वास्तवदर्शी मांडणाऱ्या महापालिका आयुक्तांनी पुन्हा यंदा विशेष राखीव निधीतून २७४३.९६ कोटी रुपये इतकी रक्कम काढून खर्च भागवण्याचं ठरवलं आहे. सोबतच बेस्टला खर्चासाठी १०० कोटींची तरतूद वगळता उपक्रमाला कोणत्याही प्रकारचं अनुदान देण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली नाही.


'असा' वाढला महापालिकेचा महसूल

महापालिकेचा अपेक्षित महसूल : २३९८५.४९ कोटी रुपये

  • जीएसटी : ८४०१.१९ कोटी
  • मालमत्ता कर : ५२०६.१५ कोटी
  • विकास नियोजन खाते : ३९४७.३८ कोटी
  • गुंतवणूक : १८५७.३९ कोटी
  • पाणी आणि मल:निस्सारण शुल्क : १३५७.२१ कोटी
  • रस्ते व पूल : ५३९.३२ कोटी
  • देखभाल आकार ' ४५७.२३ कोटी
  • शासनाकडून येणारं अनुदान : ४७१.५२ कोटी
  • परवाना शुल्क : २०६.६३ कोटी
  • रुग्णालये व वैद्यकीय रुग्णालये : १६८.२९ कोटी
  • घनकचरा व्यवस्थापन : १२६. ४४ कोटी
  • बाजार विभाग : ६५.९६ कोटी
  • इतर महसूल : ११८०.७८ कोटी रुपये

मुंबई महापालिकेचा सन २०१८-१९चा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावरकर यांना सादर केला. ७.०२ कोटी शिलकीचा २७२५८.०७ कोटींचा हा अर्थसंकल्प आयुक्तांनी मांडला. चालू आर्थिक वर्षात २.६० कोटी शिलकीचा २५१४१.५१ कोटींचा अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. त्यातुलनेत नव्या अर्थसंकल्पात २११७ कोटींनी वाढ झाली आहे.

महापालिकेच्या विद्यमान करांमध्ये तसेच दरांमध्ये कोणतीही वाढ किंवा कोणतेही नवीन कर न लादता अजोय मेहता यांनी स्थायी समितीत अर्थसंकल्प मांडला. प्रशासकीय खर्चामध्ये कार्यक्षमता आणणे आणि पायाभूत सुविधांसाठी अधिक प्रभावीपणे खर्च करण्याच्या दिशेने वाटचाल करणारा हा अर्थसंकल्प असल्याचं अजोय मेहता यांनी यात नमूद केलं आहे.


ठळक वैशिष्टये:

  • सागरी किनारा रस्ता प्रकल्पासाठी १५०० कोटी रुपये
  • गोरेगाव़-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पासाठी १०० कोटी रुपये
  • रस्ते प्रकल्पांसाठी २०५८.९२ कोटींची तरतूद
  • गावठाणांमधील रस्त्यांच्या सिमेंटीकरणासाठी १ कोटी रुपये
  • मिठी नदीसाठी १५ कोटींची तरतूद
  • घनकचरा खात्यासाठी २८३ कोटी रुपये
  • डम्पिंग ग्राऊंडचा विकास २०९ कोटी रुपये
  • तलाव व नद्यांच्या सुशोभिकरणासाठी ५ कोटी रुपये
  • राणीबागेचा विकासासाठी ५० कोटींची तरतूद
  • अग्निशमन दलासाठी १८० कोटींची तरतूद
  • मंडयांमध्ये जैविक कचऱ्याची प्रक्रिया १२ कोटी रुपये
  • टेक्सटाईल म्युझियमसाठी २५ कोटींची तरतूद
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा