Advertisement

अवनीच्या शिकारीची चौकशी होणार, स्वतंत्र समिती स्थापन


अवनीच्या शिकारीची चौकशी होणार, स्वतंत्र समिती स्थापन
SHARES

नरभक्षक अवनी वाघिणीच्या मृत्यूवरून वन्यप्रेमींनी सरकारची मुस्कटदाबी केल्यानंतर अखेर या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय वन मंत्रालयाने घेतला आहे. त्यानुसार स्वतंत्र समितीद्वारे या शिकारीची चौकशी करण्यात येणार आहे.


शवविच्छेदन अहवाल जाहीर

वाघिणीला २ नोव्हेंबर रोजी यवतमाळच्या पांढरकवडा भागात बंदुकीची गोळी घालून ठार करण्यात आलं होतं. त्यानंतर वाघिणीच्या मृत्यूवरून सरकारवर चोहोबाजूंनी टीका करण्यात आली. अवनी वाघिणीचा शवविच्छेदन अहवाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. या अहवालात अवनी वाघीण आठवडाभर उपाशी असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.


समितीत कोण?

अवनी वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली आहे. या समितीत वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सदस्य बिलाल, वन्यजीव संवर्धन ट्रस्टचे अध्यक्ष अनिष अंधेरीया हे सदस्य असतील. तर अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नितिन काकोडकर समितीचे समन्वयक म्हणून काम बघतील.

ही समिती T1 अर्थात वाघीण मृत्यू प्रकरणात मार्गदर्शक तत्व तसंच शिकारीदरम्यान स्थायी कार्यप्रणाली योग्य रितीने राबवण्यात आली किंवा नाही याची चौकशी करून शासनाला आपला अहवाल सादर करणार आहे.हेही वाचा-

मुनगंटीवार ठोकणार निरूपम यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा

...तर सरकारवरही गोळ्या झाडायच्या का - संजय राऊतRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा