पेट्रोल पंपची अपुरी सोय

 Dalmia Estate
पेट्रोल पंपची अपुरी सोय

मुलुंड - मुलुंडकरांची गेल्या कित्येक वर्षांची पेट्रोल पंपची मागणी अजूनही पूर्ण झालेली नाही. मुलुंड पश्चिमेला लाल बहाद्दूर शास्त्री मार्गावर दोन पेट्रोल पंप आहेत. परंतु मुलुंड पूर्व मध्ये एकही पेट्रोल पंप नाही. पूर्वकडील नागरिकांना पेट्रोल भरण्यासाठी पश्चिमेकडे यावे लागते. नाही तर थेट ऐरोलीत जावं लागतं. या कसरतीत पेट्रोल आणि वेळ दोन्ही वाया जातो.

निवडणुका जवळ येताच पूर्व भागात पेट्रोल पंप सुरु करण्यासंदर्भात राजकारण्यांकडून अनेक आश्वासनं दिली गेली आहेत. परंतु ती पूर्ण करण्यासाठी अजूनही कोणतीच पावलं उचलली नाहीत. जर मुलुंड पूर्व मध्ये पेट्रोल पंप उपलब्ध करून दिला, तर नागरिकांचा बराच वेळ वाचेल. तसंच पश्चिमेकडील ट्रॅफिक जामची समस्या देखील कमी होण्यास मदत होईल,असं स्थानिकांचं मत आहे.

Loading Comments