विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे (pune) शहरात बुधवारी 26 फेब्रुवारी रोजी पहाटे साडे पाचच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. सराईत गुन्हेगार असलेल्या आरोपीने स्वारगेट आगारात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार (rape) केला.
बलात्कारानंतर तिला जीवेमारण्याची धमकी ही दिली. याप्रकरणी आता पोलिसांनी कार्यवाही करायला सुरुवात केली आहे. आरोपीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं आहे. दत्तात्रय गाडे (वय 35, रा. शिक्रापूर, ता. शिरुर, जि. पुणे) असं या आरोपीचं नाव असून तो सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलं आहे.
आरोपीच्या शोधासाठी 13 पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच शोधून देणाऱ्यास पोलिसांनी 1 लाखाचं बक्षिस जाहीर केलं आहे. या प्रकरणात स्वारगेट (swargate) स्थानकात तैनात असलेल्या 23 सुरक्षा रक्षकांचं निलंबन करण्यात आलं आहे.
या प्रकरणाबाबत राजकीय स्तरावर देखील मोठे पडसाद उमटत आहेत. इतकंच नाही तर तपासात बस आगारातील बंद बसेसमध्ये अंतर्वस्त्र आणि निरोध सापडल्याने बस आगारातील बंद बसेस कितपत सुरक्षित आहेत असा प्रश्न उपस्थित राहत आहे.
मुंबईसह (mumbai) अनेक मोठ्या शहरांच्या बस आगारात बंद बसेस (close bus) असल्याचे आढळून येते. यात प्रामुख्याने एसटी महामंडळाच्या बसेस, महानगरपालिका परिवहनाच्या बसेस तसेच इतर खाजगी परिवहनाच्या बसेस असतात.
बस आगाराशिवाय शहराबाहेरच्या मोकळ्या जागेत, कमी वर्दळ अथवा कमी वापर होणाऱ्या रस्त्यांच्या दुतर्फा अशा बंद बसेस आढळून येतात. या बंद बसेस काळजीपूर्वक लक्ष न दिल्याने या बसेसचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जातो.
दारू पिणारे मद्यपी, अंमली पदार्थांची तस्करी करणारे तसेच सेवन करणारे गर्दुल्ले अशा बंद बसेसचा वापर चुकीच्या गोष्टींसाठी करतात. तसेच काही कपल्स या बसेसचा वापर शारिरीक संबंध ठेवण्यासाठी करतात. अशा कारणांमुळे अनेकदा या बसेसमध्ये अनुचित घटना घडण्याची शक्यता जास्त असते.
भविष्यात अशा बसेसवर नीट लक्ष दिले गेले नाही तर लूटमार, बलात्कार, हत्या अशा अनेक गंभीर गुन्ह्यांचे (crime) हॉटस्पॉट ठरेल यात काहीच दुमत नाही. तसेच वाहतूक पोलिसांकडूनही या बंद बसेसकडे दुर्लक्ष होत असल्याचे मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.
एरव्ही सामान्य माणसांवर वाहतुकीच्या उल्लंघनामुळे कठोर कारवाई केली जाते. नो पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या गाड्यांवर लागलीच कारवाई केली जाते. मात्र शहरातील मोकळ्या जागेवर तसेच रस्त्यांच्या दुतर्फा उभ्या असलेल्या बंद बसेसवर कोणतीही कारवाई केली जात नाही हे चिंताजनक आहे.
हेही वाचा